
मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. 2024 या वर्षात 42 हत्या झाल्या आहेत. तर जीवघेणे हल्ले 52 झाले आहेत. चालू वर्षात दोन महिन्यात तीन हत्या, तीन हाफ मर्डरच्या घटना पुढे आल्यात. समोर आलेले आकडे धडकी भरविणारे आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहाता चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होत आहे की काय अशी भिती निर्माण झाली आहे. त्याला आळा कसा घालायचा असा प्रश्न आहे पोलिस प्रशासनाला पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी जिल्हातील कायदा, सुव्यवस्था उत्तम असल्याचे म्हटले आहे. सोबतच पोलीस प्रशासनाच्या कामागिरीवर ही समाधान व्यक्त केलं आहे. पोलिस दलाला ही त्यांनी शाबासकीची थाप दिली आहे. चंद्रपूर जिल्हा म्हटलं की, डोळ्यापुढे उभा असतो ताडोबाचा हिरवागार परिसर. येथे असलेले वाघ, दुर्मिळ वन्यजीव. तसेच येथील तप्त ऊन. ब्लॅकगोल्ड सिटी अशीही या शहराची ओळख आहे.
ट्रेंडिंग बातमी - Abu Azmi News: 'नमाजसाठी बाहेर पडा, अंगावर रंग टाकला तर...' अबू आझमींचे थेट आवाहन
तसं बघितलं तर हा एक शांत जिल्हा म्हणून ही ओळखला जातो. मात्र काही वर्षापासून येथे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गोळीबार, हत्या, दरोडे, चोरीच्या घटनांचा आलेख वाढतच चालला आहे. मागील दोन वर्षाचे आकडे बघितल्यावर हे तेच चंद्रपूर आहे काय, असा प्रश्न पडल्या शिवाय रहात नाही. 2023 या वर्षात हत्येच्या 31 घटना घडल्या होत्या. तर हाफ मर्डरच्या 50 घटना समोर आल्या.
खरंतर 2024 मध्ये यात घट व्हायला हवी होती. मात्र तसं होताना दिसत नाही. 2024 मध्ये हत्येच्या घटनेत वाढ झाली आहे. एकूण 42 हत्यांनी चंद्रपूर हादरले आहे. 2025 मध्ये केवळ जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात तीन हत्या आणि तीन हाफ मर्डर झाले आहेत. चंद्रपूरातील वाढतील गुन्हेगारी बघता आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. किमान पुढील दहा महिन्यात गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाला उतरती कळा लागेल, अशी माफक अपेक्षा चंद्रपूरकरांची आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world