इस्रायलने हिजबुल्लाहवर सर्वात मोठा घाव केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हिसबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायली लष्कर IDF ने याला दुजोरा दिला आहे. आता नसराल्लाह जगाला घाबरवू शकणार नाहीत, असं देखील इस्रायलने म्हटलं आहे.
IDF ने म्हटलं की, "इस्लायल सेनेने नसरल्लाह सोबतच हिजबुल्लाचे अतिरिक्त कमांडर्सना देखील ठार केले. यापूर्वी इस्रायली लष्कराने दावा केला होता की, त्यांनी लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यांदरम्यान अनेक हिजबुल्ला कमांडर मारले आहेत. नसराल्लाहच्या मृत्यूला लेबनॉन आणि हिजबुल्लाह यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नसराल्लाह यांच्या मृत्यूची पुष्टी करत इस्रायली आर्मी आयडीएफने ट्विटरवर पोस्ट केले, 'हसन नसराल्लाह यापुढे जगात दहशत माजवू शकणार नाही.'
"इस्रायली वायुसेनेने (IAF) दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर, दहशतवादी मोहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहायक, दहशतवादी हुसेन अहमद इस्माइल याला ठार मारले ", अशी माहिती IDF ने शनिवारी दिली.
(नक्की वाचा- बायकोला घालायची होती बिकिनी, पठ्ठ्याने बेटच विकत घेतलं, किंमत ऐकून थक्क व्हाल)
आयडीएफने म्हटले आहे की, इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यांसाठी मोहम्मद अली इस्माइल जबाबदार आहे. इब्राहिम मोहम्मद काबिसी आणि हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट गटाचे इतर वरिष्ठ अधिकारी मारले गेल्याचं इस्रायली सैन्याने सांगितले. कमांडर मारल्याबद्दल इस्रायलच्या घोषणेला हिजबुल्लाहने पुष्टी केलेली नाही किंवा नाकारलेली देखील नाही.