Greenland: एक तह अन् ग्रीनलँडचं नशीब फिरलं! 212 वर्षापूर्वीचा रोमांचक इतिहास, डेन्मार्कने 'कशी' मारली बाजी

नेपोलियन युद्धात डेन्मार्कचा पराभव झाला होता. नियमानुसार त्यांना आपला मोठा प्रदेश गमवावा लागणार होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नेपोलियन युद्धाच्या समाप्तीनंतर १४ जानेवारी १८१४ रोजी झालेल्या कील तहाने ग्रीनलँडचे भवितव्य ठरवले
  • डेनमार्कने नॉर्वे स्वीडनला दिला, परंतु नॉर्वेच्या अधिपत्याखाली असलेले ग्रीनलँड स्वतःकडे ठेवले
  • अनुच्छेद IV अंतर्गत ग्रीनलँड, आइसलँड आणि फॅरो बेटे डेनमार्कच्या ताब्यात राहण्याची तरतूद केली गेली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून हा बर्फाच्छादित प्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, ग्रीनलँडवर डेन्मार्कचा ताबा कसा आला, याचा इतिहास अत्यंत रंजक आहे. आजपासून बरोबर 212 वर्षांपूर्वी, म्हणजेच 14 जानेवारी 1814 रोजी झालेल्या 'कील तहा'ने (Treaty of Kiel) ग्रीनलँडचे भवितव्य ठरवले होते. नेपोलियन युद्धाचा हा परिणाम होता. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियन बोनापार्टच्या युद्धात डेनमार्क फ्रान्सच्या बाजूने लढत होता. मात्र, नेपोलियनचा पराभव झाला आणि विजयी राष्ट्रांनी डेनमार्कवर अटी लादल्या.

या तहानुसार डेन्मार्कला नॉर्वेचा ताबा स्वीडनला द्यावा लागला. मात्र, याच वेळी डेन्मार्कच्या मुत्सद्यांनी मोठी चालाकी केली.
1814 मध्ये जेव्हा डेन्मार्क-नॉर्वे आणि स्वीडन-युनायटेड किंगडम यांच्यात शांतता करार झाला, तेव्हा डेनमार्कला मोठा भूभाग द्यावा लागला. मात्र, डेन्मार्कच्या वाटाघाटी करणाऱ्या टीमने करारात एक विशिष्ट अट टाकली. त्यांनी स्पष्ट केले की नॉर्वे स्वीडनला दिला जाईल, परंतु "नॉर्वेवर अवलंबून असलेले जुने प्रदेश" ग्रीनलँड आणि आइसलँड डेनमार्ककडेच राहतील. 

नक्की वाचा - Trending News: सातासमुद्रापार फ्रान्समध्ये 'माँ काली'ची का होते पूजा? हिंदूंशी काय आहे थेट कनेक्शन?

नेपोलियन युद्धात डेनमार्कचा पराभव झाला होता. नियमानुसार त्यांना आपला मोठा प्रदेश गमवावा लागणार होता. कराराप्रमाणे डेनमार्कने नॉर्वे देश स्वीडनला सोपवला. पण, कागदपत्रांमध्ये अशी काही खेळी केली की, नॉर्वेच्या मालकीचे असलेले ग्रीनलँड स्वीडनला मिळालेच नाही. डेनमार्कने हे बेट आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे युद्धत जरी डेनमार्क हरला असला तरी तहात मात्र जिंकला होता. 

नक्की वाचा - Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे काय? 7 दिवसांत दिसेल 'हा' फरक

तहाच्या वाटाघाटी करताना डेनमार्कने 'अनुच्छेद IV' (Article IV) अत्यंत हुशारीने समाविष्ट केला. या कलमानुसार, नॉर्वेचा मुख्य भूभाग स्वीडनला देण्यात आला, परंतु नॉर्वेच्या अधिपत्याखाली असलेले ग्रीनलँड, आइसलँड आणि फॅरो बेटे डेनमार्कने स्वतःकडेच ठेवून घेतली. अशा प्रकारे 434 वर्षांपासून नॉर्वेच्या साम्राज्याचा भाग असलेले ग्रीनलँड डेनमार्कची कॉलनी बनले. हा एक हुशारीचा भाग मानला जातो. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मोठ्या शिताफीने हे प्रदेश आपल्या हातून जावू दिले नाहीत. ते आज ही डेनमार्कच्या ताब्यात आहेत.आज त्याच ग्रीनलँडवर अमेरिकेची नजर आहे. 

Advertisement