जाहिरात

Trending News: सातासमुद्रापार फ्रान्समध्ये 'माँ काली'ची का होते पूजा? हिंदूंशी काय आहे थेट कनेक्शन?

आस्थेचे नवे रूप म्हणून याकडे पाहीले जात आहे. येथील परंपरेनुसार, मूर्तीला समुद्रात नेऊन स्नान घातले जाते.

Trending News: सातासमुद्रापार फ्रान्समध्ये 'माँ काली'ची का होते पूजा? हिंदूंशी काय आहे थेट कनेक्शन?
  • फ्रान्समधील सेंट्स मारिस डी ला मेर शहरात दरवर्षी सेंट काली साराची काळी मूर्ती समुद्रात नेऊन पूजा केली जाते
  • इतिहासकार अभिजीत चावडा यांच्या मते, जिप्सी समुदायाचे पूर्वज गुलाम म्हणून युरोपात आलेले भारतीय आहेत
  • सेंट काली सारा ही मूर्ती जिप्सी लोकांच्या श्रद्धेने काली मातेच्या रूपात पूजली जाते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

France Maa Kali worship: फ्रान्समधील एका किनारपट्टीवरील शहरात चक्क 'मां काली'ची पूजा केली जाते. असा खळबळजनक दावा इतिहासकार अभिजीत चावडा यांनी एका पॉडकास्टमध्ये केला आहे. या दाव्यामुळे आता हिंदू संस्कृती आणि युरोपमधील जिप्सी समुदाय यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये दरवर्षी एक मोठी धार्मिक यात्रा निघते. ज्यामध्ये एका काळ्या रंगाच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. या मूर्तीला 'सेंट काली सारा' या नावाने ओळखले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, ज्याप्रमाणे भारतात देवीची मूर्ती विसर्जित केली जाते, त्याचप्रमाणे फ्रान्समध्येही ही मूर्ती समुद्रात नेऊन तिला पाण्याने स्नान घातले जाते.

चावडा यांच्या मते, मध्यकाळात जेव्हा तुर्कांनी भारतावर आक्रमणे केली, तेव्हा मोठ्या संख्येने भारतीयांना गुलाम बनवून नेण्यात आले.  यातील अनेक गुलाम कालांतराने पश्चिमेकडे सरकत युरोपमध्ये पोहोचले. तिथे त्यांना 'जिप्सी' (Gypsy) असे म्हटले जाऊ लागले. या लोकांच्या संस्कृतीत आजही भारतीय श्रद्धांचे अवशेष पाहायला मिळतात. जिप्सी समुदायाचा इतिहास या गोष्टी अधोरेखीत करतो.  असे मानले जाते की, शेकडो वर्षांपूर्वी भारतातून गेलेले लोक युरोपमध्ये स्थायिक झाले आणि तेच आजचे 'रोमा' किंवा 'जिप्सी' समुदाय आहेत. जरी हा दावा पूर्णपणे सिद्ध झालेला नसला, तरी तेथील लोकांची श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत पाहून हा वारसा भारतीय असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जाते.

नक्की वाचा - Election 2026 LIVE: सर्वच एक्झिट पोलचे आकडे महायुतीच्या बाजूने, शेवटचा पोल कुणाच्या बाजूने?

सेंट सारा की काली माता? हा खरा प्रश्न आहे.  फ्रान्समधील 'सेंट्स मारिस डी ला मेर' (Saintes Maries de la Mer) या शहरात दरवर्षी एक मोठी यात्रा भरते. येथे 'सेंट सारा' (Saint Sarah) नावाच्या एका काळ्या रंगाच्या मूर्तीची पूजा केली जाते. जिला स्थानिक लोक 'सेंट काली सारा' असेही म्हणतात. ही मूर्ती वर्षातून एकदा समुद्रापर्यंत नेली जाते आणि पाण्यात बुडवून पुन्हा चर्चमध्ये आणली जाते. चावडा यांच्या मते, ही प्रथा हिंदूंच्या विसर्जन प्रक्रियेशी मिळतीजुळती आहे. जिप्सी समुदाय या मूर्तीला काली मातेचे रूप मानतो, तर ख्रिस्ती परंपरेत तिला व्हर्जिन मेरीशी जोडले जाते.

नक्की वाचा - Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे काय? 7 दिवसांत दिसेल 'हा' फरक

आस्थेचे नवे रूप म्हणून याकडे पाहीले जात आहे.  येथील परंपरेनुसार, मूर्तीला समुद्रात नेऊन स्नान घातले जाते. जिप्सी समुदाय तिला आपली संरक्षक देवता मानतो. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव असूनही या समुदायाने आपली मूळ ओळख जपून ठेवली असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विषय शैक्षणिक स्तरावर अद्याप संशोधनाचा असला, तरी जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा हा एक अनोखा आविष्कार मानला जात आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com