Seema Mishra: इंग्लंडमधील पोस्ट ऑफिसमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असणाऱ्या एका भारतीय वंशांच्या महिलेला हिशेबामध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यावेळेसही महिला आठ आठवड्यांची प्रेग्नेंट होती. पण चौकशीदरम्यान महिला निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. चुकीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावण्यात आल्याने या महिलेने माजी व्यवस्थापकीय संचालकांचा माफीनाफा फेटाळून लावला.
(पोट दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली, डॉक्टरांनी केले भलतेच उपचार, पुढे काय झाले?)
बॉसने मागितली माफी
पीडित महिलेचे नाव सीमा मिश्रा (वय 47 वर्षे) असे आहे. वर्ष 2021मध्ये एप्रिल महिन्यामध्ये सीमा यांची शिक्षा रद्द करण्यात आली. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, 12 वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिसच्या शाखेतून 75 हजार पाउंड्सची चोरी केल्याच्या आरोपाखाली चुकीच्या पद्धतीने महिलेला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तर दुसरीकडे सुनावणीदरम्यान पोस्ट ऑफिसचे ऑफिसचे माजी व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड स्मिथ यांनी सीमा मिश्रा यांची माफी मागितली. पण सीमा यांनी माफीनामा फेटाळून लावला.
लंडनमधील पोस्ट ऑफिस होरायझन आयटी सिस्टम (Post Office Horizon IT inquiry) चौकशीसंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान, सीमा मिश्रा (Sima Misra) यांना दोषी ठरवल्यानंतर पोस्ट ऑफिसचे माजी व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड स्मिथ यांनी ईमेलद्वारे टीमचे अभिनंदन केले. याचसंदर्भात त्यांनी आता सीमा यांची माफी मागितली. ई-मेलसंदर्भात झालेल्या चौकशीदरम्यान स्मिथने म्हटले की," केवळ टीमने केलेल्या कामगिरीची दखल म्हणून अभिनंदन करण्यासाठी ईमेल केला होता".
याबाबत पुढे स्मिथ यांनी असेही म्हटले की,"माझ्या ई-मेलमुळे सीमा मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना खूप त्रास होईल, हे माहिती होते आणि याबाबत मी माफी मागू इच्छितो. एखाद्या गर्भवतीला तुरुंगात जावं लागणं, हे एक चांगले वृत्त आहे; असा मी कधीही विचार करणार नाही आणि ई-मेलमध्ये मी लिहिलेला मजकूर अशा पद्धतीने वाचला गेला, याचे मला फार वाईट वाटते. या प्रकरणामुळे सीमा यांना झालेला त्रास मी समजू शकतो आणि त्याबाबत मी मनापासून माफी मागतो".
अनुभव अतिशय भयंकर - पीडित महिला
दरम्यान पत्रकारांशी बातचित करताना सीमा मिश्रा यांनी स्मिथ यांचा माफीनामा फेटाळून लावला. बीबीसी या वृत्तसंस्थेशी बातचित करताना सीमा मिश्रा यांनी म्हटले की,"मी आठ आठवड्यांची गर्भवती होते. त्यांनी माझ्या मुलाची माफी मागावी. हा अनुभव अतिशय भयंकर होता. त्यांनी मागितलेली माफी मी स्वीकारलेली नाही. आता चौकशीसाठी हजर राहावे लागेल, हे कळल्यानंतर अचानक त्यांना केलेल्या चुकांची जाणीव होत आहे".
(मोठी बातमी : Google सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे)
आयटी सिस्टमच्या परीक्षणासाठी महिलेचा वापर?
स्मिथने चौकशीदरम्यान सांगितले की, सिस्टमची (Horizon IT Accounting System) चाचणी करण्यासाठी सीमा मिश्रा यांचा वापर करण्यात आला होता आणि या केसच्या यशामुळे होरायझन आयटी अकाउंटींग सिस्टममध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या प्रकरणाबाबत सीमा मिश्रा यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, "परीक्षणासाठी एखाद्या माणसाचा कसा वापर करू शकतात? मी एक जीवंत माणूस आहे. परीक्षणाकरिता माझ्या केसचा वापर केला गेला, असे मी ऐकले आहे. ही बाब अतिशय त्रासदायक आहे".
या संतापजनक प्रकरणामुळे सीमा मिश्रा यांची दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील ब्राँझफील्ड तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली होती. जवळपास साडेचार महिने त्यांनी तुरुंगवास भोगला. तुरुंगातच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
(जे. रॉबर्ट ओपेनहायमर कोण होते? अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर स्वत:च झाले होते भयभीत)