Blood Cancer: डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला त्रासदायक वैद्यकीय चाचण्यांचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. टेक्सासमधील रहिवासी असलेल्या 39 वर्षीय लिसा मोंक यांना वर्ष 2023च्या सुरुवातीस रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) ग्रासल्याचे निदान झाले. 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, कर्करोगाचे निदान झाल्याने मोंक यांना वेदनादायी केमोथेरपीचे उपचार घ्यावे लागले. दरम्यान औषधोपचार सुरू असताना काही आठवड्यांनंतर मोंक यांच्या आरोग्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. लिसा यांना कॅन्सरने ग्रासलेच नव्हते, अशी माहिती उघडकीस आली.
नेमके काय आहे प्रकरण?
लिसा यांना पोटदुखीमुळे असह्य शारीरिक त्रास होऊ लागला होता. मुतखड्यांमुळे पोटदुखी होत असल्याची शंका त्यांना होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचणी केल्यानंतर मुतखड्याची समस्या असल्याचे समजले. तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील रक्ताचा कर्करोग असल्याचेही निदान झाले. या गंभीर आजाराबाबतची माहिती कळताच त्यांना मोठा धक्का बसला. 'समाचार रिपोर्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, लिसाने आपल्या जवळच्या नातेवाईकांना/ मित्रपरिवारास पत्र लिहून आजाराबाबत कळवले. कारण आपण आता अधिक काळ आयुष्य जगू शकणार नाही, अशी भीती त्यांना वाटू लागली.
मेडिकल रिपोर्ट्समुळे महिलेला बसला मोठा धक्का
लिसा यांनी सांगितले की, "जेव्हा डॉक्टरांनी मला कॅन्सर झाल्याचे सांगितले, तेव्हा मला धक्का बसला. हा आजार गंभीर असल्याचे मला सांगण्यात आले. घरी जाऊन मला माझ्या दोन मुलांना आजाराची माहिती द्यावी लागली. पण मानसिकरित्या खचून न जाता मी याविरोधात लढा देण्याचा ठरवले".
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एका कॅन्सर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये लिसा मोंक यांनी मार्च 2023पासून केमोथेरपी उपचार घेण्यास सुरुवात केली. उपचारांमुळे त्यांना केसगळती तसेच शारीरिक अशक्तपणा या समस्यांचा सामना करावा लागला. एप्रिल महिन्यामध्ये दुसऱ्यांदा केमोथेरपी करण्यापूर्वी त्यांना काही मेडिकल टेस्ट केल्या. यानंतर आलेल्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये लिसा यांच्या आरोग्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. लिसा यांना कर्करोगाची लागण झालीच नव्हती, असे समजले. रिपोर्टमधील गंभीर चूक याद्वारे उघडकीस आली.
मेडिकल रिपोर्टमधील गंभीर चूक
मेडिकल रिपोर्ट्समुळे समोर आलेल्या नव्या माहितीमुळे लिसा यांना धक्का बसला पण दुसरीकडे दिलासा देखील मिळाला. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी सांगितले की, मी सर्व प्रथम नर्सकडे पाहिले आणि तिने मला शारीरिक लक्षणांची माहिती विचारली. संवाद साधत असताना ती कम्प्युटरमधील माहिती देखील वाचत होती. अचानक तिने मध्यातच संवाद थांबवला आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले.
पुढे लिसाने असेही सांगितले की, नर्स अतिशय घाबरलेली दिसत होती. डॉक्टरांना बोलावणे गरजेचे आहे, असे म्हणत ती हॉस्पिटलच्या रूममधून बाहेर पडली. 15 मिनिटांनंतर डॉक्टर आले व त्यांनी वैद्यकीय चाचणीबाबत माहिती देत मला कॅन्सरने ग्रासलेले नाही, असे सांगितले.
आणखी वाचा
'भारत दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारतोय' ब्रिटीश वृत्तपत्राच्या दाव्यावर सरकारनं दिलं उत्तर
मोठी बातमी : Google सर्च करण्यासाठी मोजावे लागणार पैसे
जगातील सर्वात सेफ विमान! बाप लेकीचा क्युट Video पाहून तुमचा मूड होईल फ्रेश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world