"भारत जळणारा नाही, तर सूर्याप्रमाणे प्रकाश देणारा", PM मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचेही कौतुक केले आणि त्यांना भारताचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हटलं.  त्यांच्यामुळेच भारत-अमेरिका भागीदारी बहरत आहे. दोन महान लोकशाहींना एकत्र आणणारे हा पूल आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था, पर्यावरणापासून जागतिक संकटांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका जगासमोर मांडली. तसेच भारताची प्रगती झपाट्याने कशी होत आहे याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचेही कौतुक केले आणि त्यांना भारताचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हटलं.  त्यांच्यामुळेच भारत-अमेरिका भागीदारी बहरत आहे. दोन महान लोकशाहींना एकत्र आणणारा हा पूल आहे.

  1. लोकसभा निवडणुकीतील विजयाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. गेल्या 60 वर्षांत भारतात असे घडले नव्हते. भारतातील जनतेने इतका मोठा जनादेश दिला आहे. त्यामुळे तिप्पट ताकद आणि तिप्पट वेगाने पुढे जायचे आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे युग असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. 
  2. संपूर्ण जगासाठी  2024 हे वर्ष खूप महत्वाचे आहे. एकीकडे जगातील बर्‍याच देशांमध्ये संघर्ष आणि तणाव आहे. तर दुसरीकडे, अनेक देशांमध्ये लोकशाही साजरी केली जात आहे. लोकशाहीच्या उत्सवात भारत आणि अमेरिकाही एकत्र आहेत.
  3. आम्ही आगीसारखे जळणारे नाही तर सूर्यकिरणांसारखे प्रकाश देणारे आहोत. आपल्याला जगावर वर्चस्व गाजवायचे नाही, तर जगाच्या समृद्धीसाठी आपले योगदान वाढवायचे आहे. भारत जीडीपी वाढीबरोबरच मानव केंद्रित वाढीला प्राधान्य देत आहे, असं मोदी यांनी म्हटलं.
  4. भारत आता संधींची भूमी आहे. आता भारत संधींची वाट पाहत नाही तर संधी निर्माण करतो. गेल्या दहा वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात संधींचे लॉन्चिंग पॅड तयार केले आहे. अवघ्या एका दशकात 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. हे घडले कारण आपण आपली जुनी विचारसरणी बदलली आणि आपला दृष्टिकोन बदलला. आम्ही गरीबांना सक्षम बनवण्यावर भर दिला, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता भारत मागे राहणार नाही. आता भारत आघाडीवर आहे. UPI चा संदर्भ देत ते म्हणाले, भारताने जगाला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची नवीन संकल्पना दिली आहे. यामुळे पारदर्शकतेला चालना मिळाली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारही कमी होतो. आज तुमच्या खिशात वॉलेट आहे. पण भारतात लोकांच्या खिशात मोबाईल असलेले वॉलेट असते.
  6. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. आपण देशासाठी मरू शकत नाही, पण देशासाठी जगू शकतो. देशासाठी मी माझे प्राण देऊ शकलो नाही. मात्र समृद्ध भारतासाठी मी माझे जीवन समर्पित करेन. मलाया देशातील जीवनशैलीचा आणि आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे.
  7. मी माझी दिशा वेगळी ठरवली होती, पण नियतीने मला राजकारणात नेले, असे पंतप्रधान म्हणाले. एका दशकात भारत 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आता भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आज भारतातील लोकांमध्ये दृढनिश्चय आहे आणि तो पूर्ण करण्याची इच्छा आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 
  8. कार्बन उत्सर्जनात भारत बराच मागे असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जग उध्वस्त करण्यात आमची भूमिका नाही. जगाच्या तुलनेत भारत नगण्य कार्बन उत्सर्जन करतो. आपण कार्बन देखील जाळू शकतो पण तसे केले नाही. 
  9. जगातील जवळपास प्रत्येक मोबाईल ब्रँड मेड इन इंडिया आहे. आज आपण मोबाईल निर्यात करतो. आता भारतही मागे नाही. नवीन प्रणाली निर्माण करून भारत आघाडीवर आहे. आता भारतात लोक खिशातून पैसे काढण्याऐवजी डिजिटल पेमेंट करतात. कागदपत्रेही डिजिटल ठेवली जातात. भारत आता थांबणार नाही. 
  10. जगासाठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मात्र माझा विश्वास आहे की एआय म्हणजे अमेरिकन-इंडियन.  AI चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसून अमेरिका आणि भारताची शक्ती आहे.

Topics mentioned in this article