Shubhanshu Shukla : वेलकम बॅक शुभांशू! Axiom-4 यान पृथ्वीवर परतले, वाचा काय आहेत मोहिमेची वैशिष्ट्ये

Shubhanshu Shukla Return, Axiom-4 Misson splashdown Live Updates: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं अंतराळातून पृथ्वीवर आगमन झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Shubhanshu Shukla Return, Axiom-4 Misson splashdown Live Updates: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं अंतराळातून पृथ्वीवर आगमन झालं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) 18 दिवस घालवल्यानंतर शुभांशु शुक्ला ॲक्सिओम-४ (Axiom-4) या अवकाश मोहिमेतील इतर 3 अंतराळवीरांसोबत परतले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात हे यान उतरले. 

काय आहेत मोहिमेची वैशिष्ट्ये?

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. 150 अब्ज डॉलर किमतीच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) भेट देणारे ते पहिले भारतीय आहेत.

ॲक्सिओम स्पेस (Axiom Space) या खासगी अंतराळ संस्थेने नासा (NASA) आणि इस्रो (ISRO) यांच्या सहकार्यानं झाला. यामध्ये भारताला सुमारे 70 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 550 कोटी रुपये) खर्च आला. ॲक्सिओम स्पेसने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडल्यानंतर सुमारे 433 तास, 18 दिवस आणि पृथ्वीभोवती 288 फेऱ्या पूर्ण करून, 12.2 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून ॲक्सिओम मिशन 4 (Ax-4) चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले.

( नक्की वाचा : भारत अंतराळातून कसा दिसतो? शुभांशू शुक्लांनी दिलं PM मोदींना उत्तर, वाचून वाटेल अभिमान )
 

क्रू कॅप्सूलला (Crew capsule) आपल्या परतीच्या प्रवासासाठी सुमारे 22.5 तास लागले आहेत. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या व्यतिरिक्त, या क्रूमध्ये अमेरिकन अंतराळवीर कमांडर पेगी व्हिटसन (Peggy Whitson), पोलंडचे मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होझ उझ्नान्स्की-विस्निव्हस्की (Slawosz Uznanski-Wisniewski) आणि हंगेरीचे टिबोर कापू (Tibor Kapu) यांचा समावेश होता.

Advertisement

ॲक्सिओम स्पेसचं हे यश भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी एक ऐतिहासिक टप्पा होता. चार दशकांहून अधिक काळानंतर, या राष्ट्रांनी आपले राष्ट्रीय अंतराळवीर अंतराळात पाठवले आणि प्रथमच त्यांचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिले आणि काम केले. या मोहिमेने या सर्व देशांसाठी अंतराळ संशोधनात एक नवीन अध्याय सुरू केला आहे, ज्यामुळे भविष्यातील मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि जागतिक अंतराळ समुदायात व्यापक सहभागाला प्रेरणा मिळाली आहे.

या मोहिमेमुळे भारताचा जागतिक अंतराळ समुदायात महत्त्वाचा देश म्हणून उदय झाला. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 साली सोव्हिएत अंतराळ स्थानक सॅल्यूट-7 (Salyut-7) वर सात दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवला होता. आता, शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि त्यांनी सुमारे तीन आठवडे अंतराळात घालवले आहेत.

Advertisement