जाहिरात

भारत अंतराळातून कसा दिसतो? शुभांशू शुक्लांनी दिलं PM मोदींना उत्तर, वाचून वाटेल अभिमान

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेले पहिले भारतीय शुभांशूशुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला.

भारत अंतराळातून कसा दिसतो? शुभांशू शुक्लांनी दिलं PM मोदींना उत्तर, वाचून वाटेल अभिमान
Shubhanshu Shukla : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेले पहिले भारतीय शुभांशू शुक्ला  यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला.
मुंबई:

PM Narendra Modi talks to indian astronaut Shubhanshu Shukla : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेले पहिले भारतीय शुभांशू शुक्ला  यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला. पंतप्रधानांनी 'नमस्कार'ने संवादाची सुरुवात करत म्हणाले की, "आज तुम्ही भारतापासून दूर आहात, पण भारताच्या आकांक्षा तुमच्या सोबत आहेत. तुमच्या नावातही 'शुभ' आहे, तुमची ही यात्रा नव्या युगाची सुरुवात आहे. आपण दोघे बोलत असलो तरी, माझ्या आवाजातून 140 कोटी भारतीयांचा उत्साह व्यक्त होत आहे. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा."

मी कधी विचारही केला नव्हता....

पंतप्रधानांनी शुभांशू शुक्ला यांना विचारले की, "तिथे सर्व कुशल-मंगल आहे ना, तुमची तब्येत ठीक आहे ना?" यावर शुक्ला म्हणाले की, "भारतीयांच्या सदिच्छांमुळे मी इथे ठीक आहे. मी लहान असताना कधी विचारही केला नव्हता की मी कधी अंतराळात पोहोचेल. आज तुमच्या (पंतप्रधानांच्या) नेतृत्वाखालील आजचा भारत स्वप्नांना साकार करण्याची संधी देतो. याचंच हे परिणाम आहे की, मी देशाचं प्रतिनिधित्व करू शकलो."

अंतराळातून भारत कसा दिसतो?

पंतप्रधानांनी शुभांशू यांना विचारले की, "तुम्ही सोबत घेऊन गेलेला गाजर हलवा, मूग डाळ हलवा, आमरस तुमच्या सहकाऱ्यांना खायला दिला की नाही?" यावर शुभांशू म्हणाले की, "हो, आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला." शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, "अंतराळातून पाहिल्यावर भारत खूप भव्य दिसतो, नकाशात दिसतो त्याहूनही जास्त भव्य दिसतो."

( नक्की वाचा : पुण्याहून लवकरच युरोपात विमानानं जाता येणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा )

 

काय गृहपाठ दिला?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझी सवय आहे की मी जेव्हा कोणाला भेटतो, तेव्हा गृहपाठ (होमवर्क) देतो." पंतप्रधानांनी शुभांशू यांना सांगितले की, "तुमचा गृहपाठ हा आहे की, तुम्हाला जो अनुभव मिळत आहे, त्याचा उपयोग आपल्याला गगनयानला पुढे नेण्यासाठी आणि चंद्रावर लँडिंग करण्यासाठी करायचा आहे."

यावर शुभांशू म्हणाले की, "मला इथे जे अनुभव मिळत आहेत, ते खूप मौल्यवान आहेत. मी जेव्हा परत येईन, तेव्हा निश्चितच गगनयानसह इतर मोहिमांना पुढे नेण्यासाठी काम करेन." शुभांशू यांनी सांगितले की, गगनयानबद्दल अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांमध्येही उत्साह आहे. "जेव्हा त्यांनी मला विचारलं की, आम्ही गगनयानवर कधी जाऊ शकतो, तेव्हा मला आनंद झाला," असंही ते म्हणाले.

( नक्की वाचा : Toll Comparison: रस्तेप्रवास होईल स्वस्त! कमी टोल लागेल असा रस्ता दाखवेल हे अ‍ॅप )

पंतप्रधान मोदींनी शुभांशू यांना सांगितले की, "आम्ही सगळ्यांना तुमच्या परत येण्याची वाट पाहत आहोत. स्वतःची काळजी घ्या, भारतमातेचा सन्मान वाढवत रहा. तुमच्यासोबत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आहेत." पंतप्रधानांनी 'भारत माता की जय' म्हणून संवादाची सांगता केली. शुभांशू यांनीही प्रत्युत्तरात 'भारत माता की जय' म्हटले.

यापूर्वी, अंतराळात यशस्वी उड्डाण केल्याबद्दल पंतप्रधानांनी बुधवारी शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन केले होते. त्यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले होते की, भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत आहे.

पंतप्रधानांनी पुढे लिहिले होते की, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनण्याच्या मार्गावर आहेत. ते आपल्यासोबत 140 कोटी भारतीयांच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा घेऊन गेले आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com