अमेरिकेत एका व्यक्तीला त्याचा धर्म विचारून १५ वेळा सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात कोर्टात दाखल केलेल्या न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ४८ वर्षांच्या पीटर मायकल लार्सनने तपासनीसांना सांगितलं की, त्याने जाणूनबुजून पीडित व्यक्तीवर हल्ला केला. पीडित व्यक्तीचं नाव सोहेल असल्याचं सांगितलं जात आहे.
आरोपीने सांगितलं की, पीडित मुस्लीम होता म्हणून त्याने हल्ला केला. आरोपीने कबुल केलं की, मुस्लीम व्यक्ती त्याला जीवे मारायची इच्छा होती. ही घटना सोमवारी १३ जुलै २०२६ रोजी वेस्ट वॅली सिटीच्या वॅली फेयर मॉलमध्ये घडली. पोलिसांनी सांगितलं की, लार्सन त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि बोलणं सुरू केलं. हल्ला करण्यापूर्वी त्याचा धर्म विचारला. अधिकाऱ्यांनी लार्सनवर हत्येचा प्रयत्न आणि धोकादायक शस्त्र ठेवल्याचा आरोप आहे. त्याला साल्ट लेक काऊंटी तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.
मी भारतीय मुस्लीम आहे...
एका ज्वेलरी स्टोअरमध्ये काम करणारी लुना नुनेजने ABC साल्ट लेक सिटीला सांगितलं की, लार्सनने सर्वात आधी सोहेलला विचारलं, तू कोणत्या देशाचा आहे. यावर सोहेल म्हणाला, मी भारतातून आलोय, माझं नाव सोहेल आहे. लार्सनने विचारलं, तू मुस्लीम आहेत आणि सोहेलने हो म्हणताच, सुऱ्याने त्याच्यावर हल्ला केला.