जाहिरात

डॉक्टरांनी 'फक्त 3 तास' आयुष्य सांगितलं होतं! मृत्यूशी संघर्ष करत 'या' तरुणाने उभं केलं 100 कोटीचं साम्राज्य

Inspiration Story : डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, यांगला एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार झाला आहे, ज्यामुळे त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होत आहेत.

डॉक्टरांनी 'फक्त 3 तास' आयुष्य सांगितलं होतं! मृत्यूशी संघर्ष करत 'या' तरुणाने उभं केलं 100 कोटीचं साम्राज्य
Inspiration Story : डॉक्टरांनी त्याला फक्त 3 तास आयुष्य असल्याचं सांगितलं होतं.
मुंबई:

Inspiration Story : आयुष्य कधी आणि कोणत्या क्षणी कलाटणी घेईल, हे कुणालाच माहीत नसतं. सहसा तरुण मंडळी वयाच्या 18 व्या वर्षी कॉलेज, करिअर आणि नवीन स्वप्नांच्या दुनियेत रमलेले असतात. पण, झेंघुआ यांग (Zhenghua Yang) मात्र त्यावेळी मृत्यूशी संघर्ष करत होता. युनिव्हर्सिटीतील पहिल्या सेमिस्टरमध्ये असताना, अचानक झालेल्या एका साध्याशा नाकातून रक्त येण्याच्या घटनेने यांगच्या आयुष्याला अत्यंत गंभीर वळण दिले.

डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले की, यांगला एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार झाला आहे, ज्यामुळे त्याच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगाने कमी होत आहेत. त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले, “तुमच्याकडे फक्त 3 तास शिल्लक आहेत.” मात्र, नशिबाने त्याला दुसरी संधी दिली. तो वाचला खरा, पण पुढील 2 वर्षे त्याचा काळ रुग्णालये आणि उपचारांमध्येच गेला.

कशामुळे मिळाला आधार?

या कठीण काळात, यांगला सर्वात मोठा आधार मिळाला तो व्हिडिओ गेम्समधून. लीग ऑफ लीजेंड्स, माइन्क्राफ्ट आणि वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट यांसारखे गेम्स त्याच्या वेदना, भीती आणि चिंता विसरण्याचे माध्यम बनले. याच दरम्यान त्याला एक कल्पना सुचली.जर गेम्स पाहून एखाद्या व्यक्तीला जगण्याची ताकद मिळू शकते, तर मग असे गेम्स का बनवू नयेत जे लोकांचे आयुष्य बदलून टाकतील? असा विचार त्याला सुचला.

( नक्की वाचा : Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ? )

 

याच विचारातून यांगने 1,000 डॉलरच्या (सुमारे 83,000 रुपये) भांडवलातून Serenity Forge या गेमिंग कंपनीची सुरुवात केली. हे एक असे स्टुडिओ आहे जे फक्त मनोरंजनावर नव्हे, तर भावनात्मक आणि अर्थपूर्ण अनुभवांवर आधारित गेम्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.

जगानं घेतली दखल

दहा वर्षांहून अधिक काळामध्ये यांगच्या स्टुडिओने सुमारे 70 गेम्स बनवले आहेत. यापैकी Doki Doki Literature Club या गेमने जगभर खूप मोठी प्रसिद्धी मिळवली. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल 80 कोटी रुपये ते 120 कोटी रुपये या दरम्यान आहे.

विशेष म्हणजे, यांग पैशांपेक्षा जास्त महत्त्व गेम्सच्या 'इम्पॅक्ट'ला, म्हणजेच समाजात सकारात्मक बदल घडवण्याला देतो. यांगने फॉर्च्यूनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने असे अनेक प्रकल्प नाकारले की ज्यातून कोट्यवधी रुपये कमावता आले असते, पण ते प्रकल्प त्याच्या मूळ विचारसरणीशी जुळत नव्हते.

( नक्की वाचा : Ravindra Jadeja : जडेजाच्या पत्नीनेच केला भारतीय खेळाडूंच्या व्यसनांचा पर्दाफाश; रिवाबांच्या खुलाश्यानं खळबळ )

यांग सांगतो की, त्याचे अनेक चाहते त्याला भेटून सांगतात की त्याच्या गेम्समुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले. कुणाला चुकीच्या नात्यातून बाहेर पडण्याची हिंमत मिळाली, तर कुणाच्या मानसिक आरोग्यात सुधारणा झाली, तर कुणाला स्वतःला पुन्हा ओळखण्याची शक्ती मिळवली. यांग म्हणतो, "हे प्रेम माझ्यासाठी कोट्यवधी रुपयांपेक्षाही मोठे आहे."

यांगचा असा विश्वास आहे की, यश अशा लोकांना मिळते जे चुका करण्यास घाबरत नाहीत. तो म्हणतो की प्रत्येक अपयश तुम्हाला एका नवीन मार्गाकडे ढकलते; फक्त तो मार्ग स्वीकारण्याचे धाडस तुमच्यात असायला हवे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com