Iran Attacks Israel Video : पश्चिम आशियातील संघर्षाला मोठं वळण, इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

Iran Attacks Israel : पश्चिम आशियातील स्फोटक परिस्थितीला मंगळवारी रात्री (1 ऑक्टोबर 2024) नवं वळण लागलं आहे. इराणनं इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्राचा हल्ला केला

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

हमासच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून सुरु झालेल्या पश्चिम आशियातील स्फोटक परिस्थितीला मंगळवारी रात्री (1 ऑक्टोबर 2024) नवं वळण मिळालं आहे. इराणनं इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्राचा हल्ला केला. इस्रायलनं गेल्या काही दिवसांपासून इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई केली होती. या कारवाईचा बदला घेण्यासाठी इराणनं हा हल्ला केला आहे. इराण इस्रायलवर अशा प्रकारचा हल्ला करु शकतो, असा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यानंतर काही तासांमध्येच हा हल्ला झाला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

  इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये हा हल्ला कशा प्रकारे होता हे स्पष्ट दिसत आहे. इराणची क्षेपणास्त्रं एकापाठोपाठ एक इस्रायलवर आदळली.

इस्रायलवर झालेल्या हवाई हल्ल्याच्या दरम्यान सायरनचा आवाज देखील या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. तेल अवीव,जेरुसलेम या इस्रायलमधील दोन प्रमुख शहरांमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले. 

हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नसरल्लाहची इस्रायलनं हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. 


इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घेतला. इराणची अनेक क्षेपणास्त्र हवेत नष्ट केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. या हल्ल्यात खूप कमी लोकं जखमी झाल्याचं इस्रायलनं म्हंटलं आहे. 

इस्रायलनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आम्ही सर्व प्रकारचे उपाय करत आहोत, असंही इस्रायलनं सरकारनं सांगितलंय. या हल्ल्याला चोख उत्तर दिलं जाईल असा इशारा इस्रायलनं इराणला दिलाय.