Iran Israel War: इराणने डाव टाकला! मोठा निर्णय घेतल्याने भारताची कोंडी, फायदा फक्त एका देशाला...

या युद्धामुळे निर्माण झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी आता जागतिक स्तरावर कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • इराणने होर्मुज सामुद्रधुनी मार्गावर फक्त चीनच्या जहाजांना वाहतुकीची परवानगी दिली आहे
  • होर्मुज सामुद्रधुनी मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून भारत त्यावर अवलंबून आहे
  • या निर्णयामुळे भारताला इंधन पुरवठ्यात तुटवडा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा पाचवा दिवस आहे. या युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. या संघर्षाचे पडसाद जागतिक इंधन पुरवठ्यावर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणला आपली ताकद काय आणि कच्चे दुवे काय याची जाणीव आहे. ज्यावेळी युद्ध भीषण होत चाललं आहे, त्यावेळी इराणने आपला हुकमाचा एक्का खेळला आहे. इराणने 'होर्मुज सामुद्रधुनी'बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. इराणच्या एका निर्णयामुळे भारतासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. इराणने या मार्गावरून केवळ चिनी जहाजांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. इतर देशांची जहाजं जर या मार्गातून गेली तर त्यांच्यावर थेट हल्ला केला जाईल अशी धमकीच इराणने दिली आहे. 

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) स्पष्ट केले आहे की, पश्चिमी देश आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून प्रवेश दिला जाणार नाही. 'होर्मुज सामुद्रधुनी' जलवाहतूकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. जगभरातली जहाजं याच मार्गातून जातात. या मार्गावर इराणचा ताबा आहे. रणनितीच्या दृष्टीने इराणची ही जमेची बाजू आहे. याच मार्गाने भारत आपल्या कच्च्या तेलाची मोठी आयात करतो. जर हा मार्ग फक्त चीनसाठी खुला असेल याचा अर्थ भारतासाठी तो बंद असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याचा थेट फटका भारताला बसण्याची दाट शक्यत आहे. इराणच्या या एका निर्णयामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नक्की वाचा - 'भारताने माझा विश्वासघात केला' 37 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा देश सोडण्याचा निर्णय, थेट इराणला जाणार

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. अमेरिकन सैन्य या सागरी मार्गाला संरक्षण देतील असं ट्रम्प म्हणाले आहे. कोणत्या ही स्थितीत जागतिक इंधन पुरवठा आम्ही खंडित होऊ देणार नाही, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या भूमिकेमुळे पर्शियन आखातात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इराणने जाहीर केले आहे की, या मार्गावरून फक्त चिनी जहाजेच जाऊ शकतील. इतर कोणत्याही देशाचे जहाज दिसल्यास त्यावर थेट हल्ला केला जाईल. इराणच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे, कारण भारताच्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते.

नक्की वाचा - Dubai News : दुबईला आयुष्यातील सर्वात पहिला धक्का! 'सेफ हेवन' मॉडेल क्षणात कसं झालं उद्ध्वस्त?

इराणच्या या धमकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले आहेत. "आम्ही इंधन पुरवठा थांबू देणार नाही आणि आमच्या सैनिकांच्या मदतीने या मार्गाला संरक्षण देऊ," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता या सागरी मार्गावर इराण आणि अमेरिकेचे सैन्य समोरासमोर येण्याची चिन्हं दिसत आहेत. इराणने केवळ चीनच्या जहाजांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. भारतासाठी हा चिंतेचा विषय आहे कारण आपली ऊर्जा सुरक्षा या सागरी मार्गावर अवलंबून आहे. जर ही वाहतूक दीर्घकाळ ठप्प राहिली, तर भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने इराणच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. या युद्धामुळे निर्माण झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी आता जागतिक स्तरावर कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement