Dancing Missile: हवेतच दिशा बदलणारं इराणचं 'ते' घातक अस्त्र; फक्त 7 मिनिटांत इस्रायलचा विनाश करण्याचं सामर्थ्य

Dancing Missile Iran: इराणचे सर्वात मोठे अस्त्र असलेल्या सेजिल बॅलिस्टिक मिसाईलने, ज्याला जगाने 'डान्सिंग मिसाईल' हे नाव दिले आहे, त्याने सध्या युद्धभूमीवर खळबळ माजवली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dancing Missile Iran: इराणच्या या क्षेपणास्त्राने इस्रायल आणि अमेरिकालाही थक्क केलंय.
मुंबई:

सागर जोशी, प्रतिनिधी 

Dancing Missile Iran: आकाशात झेप घेते, क्षणात दिशा बदलते आणि शत्रूच्या रडारला चकवा देऊन थेट लक्ष्याचा वेध घेते. हे वर्णन एखाद्या हॉलिवूड चित्रपटातल्या दृश्यासारखं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात इराणच्या एका महाविनाशक शस्त्राने इस्रायल आणि अमेरिकेची झोप उडवली आहे. इराणचे सर्वात मोठे अस्त्र असलेल्या सेजिल बॅलिस्टिक मिसाईलने, ज्याला जगाने 'डान्सिंग मिसाईल' हे नाव दिले आहे, त्याने सध्या युद्धभूमीवर खळबळ माजवली आहे. आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट अधिक वेगाने धावणाऱ्या या मिसाईलचा अंदाज बांधणे जगातील प्रगत संरक्षण यंत्रणांनाही कठीण झाले आहे.

इराणने 2026 मध्ये पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धात या सेजिल मिसाईलचा वापर केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या 12 दिवसांच्या युद्धात या मिसाईलने आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर नऊ महिन्यांच्या विरामानंतर इराणने पुन्हा एकदा हे अस्त्र बाहेर काढले असून रविवारी इस्रायलवर डागले आहे. विशेष म्हणजे, ज्या इस्रायली 'आयर्न डोम' आणि अमेरिकन संरक्षण यंत्रणांचा जगात दबदबा आहे, त्या यंत्रणांनाही या डान्सिंग मिसाईलने थक्क केले आहे.

Advertisement

का म्हणतात डान्सिंग मिसाईल?

या क्षेपणास्त्रानं 'डान्सिंग मिसाईल' म्हणण्यामागे एक खास तांत्रिक कारण आहे. हे क्षेपणास्त्र हवेत झेप घेतल्यानंतर एका सरळ रेषेत न जाता आपली दिशा वेगाने बदलण्यात माहिर आहे. उंचीवर जात असताना ते एखाद्या नर्तकीप्रमाणे हवेत फिरत आणि दिशा बदलत पुढे सरकते. 

यामुळे शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला हे क्षेपणास्त्र  नेमके कुठे आदळणार, याचा अंदाज येत नाही. ताशी तब्बल 13,000 किमी वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र इराणमधून निघाल्यानंतर अवघ्या 7 मिनिटांत इस्रायलच्या तेल अवीव शहरापर्यंत पोहोचू शकते.

( नक्की वाचा : Iran Israel War : फक्त 2 तासांची नोटीस अन् युद्धाच्या मैदानात भारतीय लेकीची एन्ट्री; वाचा थरकाप उडवणारी गोष्ट )

तांत्रिक क्षमता आणि मारक पल्ला

सेजिल ही दोन टप्प्यांची बॅलिस्टिक मिसाईल असून ती ठोस इंधनावर चालते. ठोस इंधनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे क्षेपणास्त्र लाँच करण्यासाठी फार कमी वेळ लागतो. त्यामुळे शत्रूच्या उपग्रहांना किंवा रडारला ही मिसाईल डागण्यापूर्वी तिचा पत्ता लागणे अशक्य होते. सुमारे 23,600 किलो वजनाचे  हे क्षेपणास्त्र  आपल्यासोबत 700 किलोपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते. 2000 ते 2500 किमीची रेंज असल्याने केवळ इस्रायलच नाही, तर संपूर्ण पश्चिम आशिया आणि युरोपचा काही भागही या डान्सिंग मिसाईलच्या टप्प्यात येतो.

इराणचे शक्तीप्रदर्शन आणि अमेरिकेची चिंता

इराणने या लढाईत केवळ सेजिलच नाही, तर खोर्रमशहर-4 सारख्या 'मॉन्स्टर मिसाईल'चाही वापर केला आहे, जे दीड टन स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. तसेच फतह हायपरसोनिक मिसाईलच्या मदतीने इस्रायलचे अभेद्य मानले जाणारे एअर डिफेन्स भेदण्याचे प्रयत्न इराणकडून होत आहेत. याशिवाय इमाद, कद्र आणि खैबर-शिकन यांसारखी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रेही मैदानात उतरवण्यात आली आहेत. इराणने 15 मार्च रोजी यातील अनेक महत्त्वाच्या मिसाईल्सचे यशस्वी लाँचिंग करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )

आत्मघाती ड्रोनचा वाढता धोका

मिसाईल्ससोबतच इराणचे ड्रोन तंत्रज्ञानही या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रसिद्ध शाहीद-136 ड्रोननंतर आता इराणने अर्श-2 हे अधिक घातक आत्मघाती ड्रोन युद्धात आणले आहे. अर्श-2 हे शाहीद-136 पेक्षाही अधिक विनाशकारी मानले जात असून त्याचे नवे व्हिडिओ इराणने प्रसिद्ध केले आहेत. 

Topics mentioned in this article