Iran supreme leader ayatollah ali khamenei death: संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यामधील युध्दाबाबत एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुष्टीनंतर, इराणी सरकारी माध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तथापि, इराणी सरकारने अद्याप या वृत्तावर भाष्य केलेले नाही. सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या निधनाबद्दल ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर सात दिवसांची सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा करण्यात येत आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाची बातमी इराणी मीडियाकडून चालवली जात आहे. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांचा जावई आणि मुलगीही एका हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला जात आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. मात्र, यावर अजूनही सरकारकडून काही भाष्य करण्यात आले नाही. उलट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयातुल्ला खमेनी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
एकाच दिवसात इराण उद्ध्वस्त..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आशा आहे की, आयआरजीसी आणि पोलिस शांततेने इराणी देशभक्तांमध्ये विलीन होतील आणि देशाला त्याचे योग्य वैभव परत मिळवून देण्यासाठी एक युनिट म्हणून एकत्र काम करतील. ही प्रक्रिया लवकरच सुरू झाली पाहिजे, कारण खामेनींच्या मृत्यूसह देश एकाच दिवसात उद्ध्वस्त आणि जवळजवळ नष्ट झाला आहे. तथापि, जगभरात शांततेचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक तोपर्यंत जोरदार आणि अचूक बॉम्बहल्ला अखंडपणे सुरू राहील."
Bank Holidays 2026: उद्यापासून बँकाना किती दिवस सुट्टी? पाहा RBI ची बँक हॉलिडे लिस्ट