US-Israel Attacks Iran Viral Video : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत. या हल्ल्यानंतर इराणकडे जाणाऱ्या सर्व कमर्शियल फ्लाइट्सने तातडीनं त्यांचे रुट्स बदलले आणि काही मिनिटांतच इराणचं आकाश रिकामं झालं.हा व्हिडीओ फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म (Flightradar24) ने एक्सवर शेअर केला आहे.व्हिडीओ रिअल टाईम फ्लाइट डेटाच्या आधारावर तयार करण्यात आला आहे.
मिनिटांतच बदलले विमानांचे मार्ग
व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, हल्ल्याची बातमी समोर येताच अनेक आंतरराष्ट्रीय विमान इराणच्या हवाई पट्ट्यातून मार्ग बदलून शेजारच्या देशांच्या दिशेनं रवाना झाले. इराणच्या मोठ्या विभागाचा एअर स्पेस काही मिनिटांतच रिकामा झाला.इराणी अधिकाऱ्यांनी परिस्थिती समजून घेत तत्काळ त्यांचा हवाई विभाग बंद केला. त्यानंतर सर्व कर्मशियल फ्लाइट्सला वैकल्पिक मार्ग निवडायचे निर्देश देण्यात आले.
नक्की वाचा >> Akola News : अधिकारी भ्रष्ट..मला जगायचे नाही..", 'या' गावातील तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पुढे जे घडलं..
तेहरानमध्ये मोठा धमाका
इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठे धमाके करण्यात आले. शहरातील अनेक भाग, ज्यामध्ये केंद्रीय रस्ते आणि सरकारी विभागाचा समावेश आहे. या धमाक्यांमुळे परिसरात मोठी दहशत पसरली.शहारावर धुराचे मोठे लोट पसरले. यामुळे या हल्ल्याची तीव्रता समोर आली. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झने या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिलीय.त्यांनी देशभरात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. ते म्हणाले, हा हल्ला इराणपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून संरक्षण मिळवण्याकरिता करण्यात आला.हे अभियान अमेरिकेच्या दलांकडून संयुक्तपणे चालवण्यात आले.
Airspace clearing after strikes by the United States and Israel in Iran. pic.twitter.com/Oub4T6SrkF
— Flightradar24 (@flightradar24) February 28, 2026
इस्रायलमध्येही अलर्ट
हल्ला झाल्यानंतर इस्रायलमध्ये सिव्हिल डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आलं. अनेक ठिकाणी एअर रेड सायरन वाजवण्यात आले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं. इराणकडून जोरदार प्रत्युतर देण्यात येईल, अशी भीती इस्रायलच्या अधिकाऱ्यांना आहे.
Disclaimer: ही माहिती सोशल मिडिया यूजरच्या पोस्टद्वारे तयार करण्यात आली आहे. एनटीव्ही मराठी या कन्टेंटची पुष्टी करतन नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world