Israel Attack on Iran : इस्रायलने आता इराणवर हल्ला चढवला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलने शुक्रवारी, 13 जून रोजी सकाळी इराणवर हल्ला केल्याचे समजते आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणची राजधानी तेहरानवर अनेक हल्ले करण्यात आले.
इस्रायलने पूर्वसूचना देऊन इराणच्या अणुस्थळांवर आणि लष्करी स्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये मोठे स्फोट करण्यात आले. इराणच्या सरकारी टीव्हीने म्हटले की, त्यांचे हवाई संरक्षण पूर्णपणे सक्रिय आहे. या प्रकरणात, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं की, हल्ल्यानंतर इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे शुक्रवारी देशभरातील शाळा बंद राहतील.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )
इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणापासून पूर्णपणे हात झटकले आहेत. तसेच इस्रायलची ही एकतर्फी कारवाई असून त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलने डझनभर अणु आणि लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला आहे. इराणकडे काही दिवसांत 15 अणुबॉम्ब बनवण्याइतपत साहित्य आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर ऑपरेशन रायझिंग लायनवर भर दिला. त्यांनी घोषणा केली आहे की देशाने ऑपरेशन रायझिंग लायन नावाची लष्करी मोहीम सुरू केली आहे. इस्रायलच्या अस्तित्वासाठी एक गंभीर आव्हान असलेल्या इराणकडून येणाऱ्या धोक्याला दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. इराणी धोक्याला मागे टाकण्यासाठी इस्रायलने काही काळापूर्वीच कमी अंतराची लष्करी कारवाई सुरू केली होती. पण हा धोका पूर्णपणे संपेपर्यंत ही कारवाई सुरूच राहील, असे नेतन्याहू यांनी भर दिला.
(नक्की वाचा - Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट)
अमेरिकेने आधीच इशारा दिला होता
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, इराणवर इस्रायलचा हल्ला होऊ शकतो. परंतु शांततापूर्ण तोडग्याची आशा त्यांनी पुन्हा व्यक्त केली. अमेरिकन गुप्तचरांनी असे सूचित केले होते की इस्रायल इराणच्या अण्वस्त्र स्थळांवरा हल्ल्या करण्याची तयारी करत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की इस्रायल येत्या काही दिवसांत हल्ला करू शकते.