
पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि अन्य कार्यकर्त्यांसह गाजा पट्टीत जाणारी बोट दुसऱ्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही बोट इस्त्रायल सैन्याकडून रोखण्यात आली असून या सर्व जणांना इस्त्रायलला घेऊन जात असल्याची माहिती आहे. इस्त्रायल परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, बोट इस्लायली किनाऱ्याच्या दिशेने वळविण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
थनबर्ग यांच्यासह १२ कार्यकर्ते गाझा पट्टीमध्ये केलेल्या कोंडीला वाचा फोडण्यासाठी बोटीने निघाले होते. गेल्या रविवारी इटलीच्या सिसिली बेटावरुन ही बोट निघाली होती. इस्त्रायलने गाझा पट्टीतील कोंडी फोडून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी थनबर्ग आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे जाण्याच्या तयारीत होती. गेल्या अडीच महिन्यांपासून गाझामधील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नक्की वाचा - G7 Summit : अखेर G7 परिषदेसाठी भारताला कॅनडाकडून आमंत्रण, पंतप्रधान मोदींनीही मानले आभार
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटा थनबर्ग यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना इस्त्रायनने ताब्यात घेतलं आहे. इस्त्रायली नौदलाचं जहाज या सर्वांना असदोद पोर्ट घेऊन जात आहे.
यापूर्वी इस्त्रायलचे संरक्षण मंत्र्यांनी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि अन्य कार्यकर्त्यांना गाझा पट्टीच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यात येईल असा इशारा दिला होता. संरक्षण मंत्री इस्त्रायल कैट्ज रविवारी म्हणाले, इस्त्रायल कोणालाही पॅलेस्टाइन भागातील नाकेबंदी तोडण्याची परवानगी देऊ शकत नाही.
SOS! the volunteers on 'Madleen' have been kidnapped by Israeli forces.
— Freedom Flotilla Coalition (@GazaFFlotilla) June 9, 2025
Greta Thunberg is a Swedish citizen.
Pressure their foreign ministries and help us keep them safe!
Web: https://t.co/uCGmx8sn8j
X : @SweMFA
FB : @SweMFA
IG : swedishmfa#AllEyesOnMadeleen pic.twitter.com/76Myrg2Bnz
ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?
ग्रेटा थनबर्गने एक व्हिडिओ शेअर करून मदत मागितली आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, माझं नाव ग्रेटा थनबर्ग आहे आणि मी स्वीडनची आहे. आम्हाला इस्त्रायली सैन्य किंवा इस्त्रायलचा समर्थन करणाऱ्या सैनिकांनी इंटरनॅशनल वॉटरवर अडवलं आहे आणि आमचं अपहरण केलं जात आहे. मी सर्व नातेवाईक, मित्रांना विनंती करते की त्यांनी मला आणि माझ्यासोबत असलेल्या इतरांना सोडविण्यासाठी स्वीडन सरकारवर दबाव आणावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world