Israel Vs Iran: इराण-इस्रायलच्या युद्धात पाकिस्तानचे हाल! अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ

Israel Attacks Iran: बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकिल येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कारण इराणी तेल पुरवठ्याशिवाय त्यांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचा बहुतेक अन्न पुरवठा देखील इराणमधून येतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
Israel vs Iran

Iran Vs Israel : इस्रायल-इराण युद्धाचा पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. इराणचा शेजारी देश पाकिस्तानला इंधन संकटाचा सामना कराला लागत आहे. इराण-इस्रायल सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या केंद्र सरकारने पेट्रोलच्या किमतीत 4.80रुपये आणि डिझेलच्या किमतीत 7.95 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे. याशिवाय अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमध्ये हाय-स्पीड डिझेल (HSD), ज्याची किंमत पूर्वी 254.64 रुपये प्रति लिटर होती, ती आता 262.59 रुपये झाली आहे. तर पेट्रोल, ज्याची किंमत 253.63 रुपये प्रति लिटर होती, ती आता 258.43 रुपयांना उपलब्ध होईल.

Advertisement

रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील इंधन संकट गंभीर बनलं आहे. कारण इराणमधून सीमेवरून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर युद्धाचा परिणाम झाला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप बंद झाले आहेत. तेलाचा पुरवठा थांबवल्यामुळे जवळपास 60 ते 70 टक्के पेट्रोल पंप बंद पडले आहेत. 

बलुचिस्तानमधील इराणला लागून असलेल्या तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकिल येथे सर्वात जास्त परिणाम झाला आहे. कारण इराणी तेल पुरवठ्याशिवाय त्यांना अन्नटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचा बहुतेक अन्न पुरवठा देखील इराणमधून येतो.

इराणने काल रात्री इस्रायलच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी इशारा दिला. इस्रायलची राजधानी तेल अवीवमधील व्हिडीओंमध्ये इमारती उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. हल्ल्यापूर्वीच, इस्रायली सैन्याने आपल्या नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घेण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी इस्रायली क्षेपणास्त्रांनी इराणच्या आतपर्यंत हल्ला केला.

Topics mentioned in this article