Iran-Israel conflict : इस्रायलकडून इराणमधील वेगवेगळ्या ठिकाणांवर सतत बॉम्बफेक केली जात आहे. आज (16 जून) इस्रायलनं मध्य, पूर्व आणि पश्चिम इराणमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्बहल्ले केले. तेहरानमध्ये तर थेट प्रक्षेपण सुरू असताना सरकारी वृत्तवाहिनीच्या मुख्यालयावरही बॉम्ब टाकण्यात आले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला अँकर बातमी सांगत असतानाच मोठा स्फोट होतो आणि ती स्वतःचा जीव वाचवून पळताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इराणचा आरोप आहे की इस्त्रायलने उत्तर-पूर्व इराणमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले असून, हा एक मोठा हल्ला होता. इराणने असाही दावा केला आहे की इस्त्रायलच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 224 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत.
इराणमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे पोर्तुगाल, फिलिपिन्स, फिनलंड आणि इतर देशांमधील नागरिक अस्तारा सीमेमार्गे अझरबैजानची राजधानी बाकू येथे पोहोचत आहेत. जेणेकरून तिथून विमानाने ते आपल्या देशात परत जाऊ शकतील.