- कराचीतील सिंध रेंजर्स मुख्यालयावर आत्मघाती दहशतवादी हल्ला २७ जून रात्री साडेआठ वाजता झाला होता
- दहशतवादींनी स्फोटकांनी भरलेले वाहन मुख्य प्रवेशद्वारावर धडकवून गोळीबार सुरू केला आणि ग्रेनेडही फेकले होते
- हल्ल्यात चार रेंजर्स ठार झाले, सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले आणि एक जिवंत पकडला
पाकिस्तानमधील कराची शहरात मोठा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवार 27 जून रोजी रात्री हा हल्ला करण्यात आला. गुलिस्तान-ए-जौहर भागातील युनिव्हर्सिटी रोडवर असलेल्या 'सिंध रेंजर्स' या निमलष्करी दलाच्या मुख्यालयाला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं होतं. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर केला. त्यांनी या वाहनांनी मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार धडक दिली. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी लष्कराला काय घडत आहे हेच समजले नाही. शिवाय यावेळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड ही फेकले. या भीषण हल्ल्यात 4 पाकिस्तानी रेंजर्सचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी रात्री 8:30 वाजता हा भिषण हल्ला झाला. या हल्ल्यावेळी मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादला होता. याच वेळी दहशतवादी मुख्यालयाच्या आवारत ही घुसले. त्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्याची माहिती वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर कराची पोलीस, विशेष सुरक्षा पथक (SSU) आणि दहशतवादविरोधी दलाने (ATF) तातडीने घटनास्थळ गाठवे. दोन्ही बाजूंनी जवळपास 90 मिनिटे जोरदार गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले. तर 1 दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गुलिस्तान-ए-जौहर परिसर कर्फ्यू लावण्यात आला. त्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) शी संलग्न असलेल्या 'जमात-उल-अहरार' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेने सांगितले की हा हल्ला आम्हीच केला आहे. या हल्ल्यासाठी 9 जणांना तयार करण्यात आलं होतं. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस महासंचालकांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.
अफगाणीस्तान सीमेवरील संघटनेचा हा कट होता. या हल्ल्याची जबाबदारी 'जमात-उल-अहरार' या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ही संघटना अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा भागात सक्रिय आहे. हल्ल्यानंतर कराचीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी केला गेला हे अजून स्पष्ट झाले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world