Khamenei's Five Mistakes : अली खामेनींचं नेमकं काय चुकलं? धक्कादायक 5 चूका ठरल्या जीवघेण्या

अली खामेनी यांच्या पाच प्रमुख चुकांमुळे शत्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं, असं अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Khamenei's Five Mistakes २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तेहरानमध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (८६) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव मोजतबा खामेनी (५६) यांची इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अली खामेनी यांच्या पाच प्रमुख चुकांमुळे शत्रूला त्यांच्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं, असं अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

१. सुरक्षा सल्लागारांवर अतिविश्वास

खामेनी यांनी सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्यावर विसंबून एका कंपाउंडमध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेतला. अहवालानुसार, इस्रायल आणि अमेरिका शमखानी यांच्या हालचालींवर आधीच लक्ष ठेवून होते. या बैठकीची माहिती शत्रू पक्षाला मिळाली आणि त्यांनी खामेनींवर हल्ला केला.

२. सुरक्षित बंकरमध्ये न राहणं

युद्धजन्य परिस्थिती असतानाही खामेनी कोणत्याही हाय-सिक्युरिटी बंकरमध्ये राहिले नाहीत. ते एका खुल्या कंपाउंडमध्ये बैठक घेत होते. जर ते अंडरग्राउंड बंकरमध्ये असते, तर कदाचित क्षेपणास्त्र हल्ल्यापासून वाचू शकले असते. मूलभूत सुरक्षा प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करणे ही त्यांची मोठी चूक ठरली.

नक्की वाचा - 25 वर्षे, 4 राष्ट्राध्यक्ष,10 देश, लक्ष्य एक..! 25 वर्षात अमेरिकेमुळे 10 देशांचा भूगोल बदलला, वाचा खास रिपोर्ट

Advertisement


३. अमेरिकेसोबतच्या चर्चेवर विश्वास

खामेनींना वाटलं की, राजनैतिक चर्चा सुरू असल्याने थेट हल्ला होणार नाही. मात्र, शत्रूने याच चर्चेच्या दरम्यान हल्ल्याची वेळ साधली. मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्यात ते कमी पडले.

४. अण्वस्त्रांबाबतचा फतवा  

१९९० च्या दशकात खामेनींनी अण्वस्त्रे न बनवण्याचा धार्मिक फतवा काढला होता. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी हे केले असले तरी, इस्रायल आणि अमेरिकेने याला इराणची लष्करी कमजोरी मानले. तज्ज्ञांच्या मते, जर इराणकडे अण्वस्त्रांचा धाक असता, तर शत्रूने असा हल्ला करण्याचे धाडस केले नसते.

Advertisement


५. वैयक्तिक सुरक्षेचे चुकीचे आकलन

वाढत्या तणावाच्या काळातही खामेनी नेहमीप्रमाणे बैठका घेत होते. त्यांनी धोक्याचा योग्य अंदाज लावला नाही. सीआयए आणि मोसादने ट्रॅफिक कॅमेरे हॅक करून आणि सायबर हल्ल्यांच्या मदतीने त्यांचे अचूक लोकेशन शोधून काढले आणि अवघ्या ६० सेकंदात हल्ला पूर्ण केला.


नवीन नेते मोजतबा खामेनी यांच्यासमोर आव्हानं


इराणच्या 'असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स'ने मोजतबा खामेनी यांची निवड केली आहे. मात्र, पदभार स्वीकारताच समोर आलेल्या बातम्यांनुसार, इस्रायली हल्ल्यात मोजतबा देखील जखमी झाले आहेत. त्यांना आपल्या वडिलांच्या चुकांमधून धडा घेणं आवश्यक ठरणार आहे. 
 

Advertisement