FIFA Word Cup Final : लिओनेल मेस्सीनं चाहत्यांना केलं भावुक, मेस्सीचा शेवटचा मेसेज होतोय व्हायरल

फिफा वर्ल्डकप 2026 चा फायनलचा सामना आज रविवारी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. या सामन्याआधी लियोनेल मेस्सीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना भावुक केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Lionel Messi Viral Post

Lionel Messi on FIFA World CUp Final: फिफा वर्ल्डकप 2026 चा फायनलचा सामना आज रविवारी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. या सामन्याआधी लियोनेल मेस्सीने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना भावुक केलं आहे. मेस्सीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत फायनलआधी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.या पोस्टमध्ये मेस्सीने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघासोबत असलेल्या वर्षानुवर्षांच्या आठवणी ताज्या केल्या.टीमसोबत जोडलेल्या सर्व लोकांचं आभार मानलं.एका कुटुंबाप्रमाणे टीमला तयार करण्यात मदत करणाऱ्या खेळाडूंचे त्याने आभार मानले.

मेस्सीची खास पोस्ट व्हायरल

या वर्षांतील सर्वात सुंदर गोष्ट फक्त ट्रॉफीच राहिल्या नाहीत,तर संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण,कठीण काळात एकमेकांची साथ आणि प्रत्येक प्रवासातील आनंदाचे क्षण राहिले.त्याने त्याचे साथीदार,कोचिंग स्टाफ आणि संघासोबत जोडलेल्या प्रत्येक सदस्याचे आभार मानले. तो म्हणाला, निकाल काहीही असो, या टीमने आधीच अशाप्रकारीच कहाणी लिहिली आहे, जी कोणी पुसू शकत नाही. शेवटी त्याने लिहिलं, "ये अर्जेंटिना.."

Advertisement

नक्की वाचा >> Jalgaon News: जामनेरमधील विवाहितेच्या सामूहिक अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, संतापजनक माहिती उघड

"माझ्यासाठी संघ म्हणजे कुटुंब"

मेसीच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांना भावुक केलं आहे. मेस्सी या सामन्यानंतर इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये निवृत्तीची घोषणा करेल.त्याने अर्जेंटिना टीमला एक कुटुंब म्हटलं आहे.तसच त्याने फायनल सामन्यासाठी त्याच्या सहकारी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. संघाने याआधीही अशाप्रकारचं यश मिळवलं आहे,त्यामुळे या गोष्टींचा त्याला नेहमीच अभिमान असणार आहे. 

नक्की वाचा >>Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे' पॅटर्न, तरीही पुणेकरांचं आरोग्य धोक्यात? महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड


Topics mentioned in this article