मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात 30 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रॅक्टरचे भाडे न दिल्याच्या कारणावरून विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पीडितेला बंदुकीचा धाक दाखवून गुंगीचं औषध दिलं,तसच तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला, अशी संतापजनक माहिती आता उघडकीस आली आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'तुकाराम मुंढे' पॅटर्न, तरीही पुणेकरांचं आरोग्य धोक्यात? महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड
पोलिसांनी चारही संशयित आरोपींना केली अटक
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टरचे भाडे न दिल्याच्या कारणावरून हा प्रकार घडलेला नाही. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून तिला गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.पोलिसांनी याप्रकरणी चारही संशयित आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, याप्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
नक्की वाचा >> Beautiful Waterfall: महाराष्ट्रातील 'या' पर्यटनस्थळावर होतेय प्रचंड गर्दी, दूधसागर धबधबे पर्यटकांना खुणावतायत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world