Los Angeles fire :अमेरिकेत आगीचं तांडव कायम, 25 जण दगावले; आतापर्यंत 13 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज 

अमेरिकेतील लॉस एँजिल्सच्या जंगलांमधील आगीचं थैमान कायम असून पाच दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेतील लॉस एँजिल्सच्या जंगलांमधील आगीचं थैमान कायम असून पाच दिवसांनंतरही आगीवर नियंत्रण आणणं शक्य झालेलं नाही. या आगीमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या दिवसात मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या थंडी आहे. मात्र तरीही आग विझण्याऐवजी अधिक पसरत आहे. आतापर्यंत या आगीमुळे 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून सहा दिवसानंतरही वणवा अजूनही कायम आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल दाखल झालं आहे. वणवा विझवण्यासाठी पाण्याचा प्रचंड वापर केल्यानं 20 टक्के तलाव सुकले आहेत. पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पॅरिस हिल्टन, टॉम हॅक्स, स्टीव्हन स्पीलबर्ग यांची घरे जळाली. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांचे घरही रिकामी केलं आहे. 

नक्की वाचा - Los Angeles Fire :अमेरिकेत अग्नितांडव,1 लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर; भयावह परिस्थिती 

मिळालेल्या माहितीनुसार, आग लांबपर्यंत पसरत आहे. गेल्या 24तासात आग पेलिसाडेसच्या एक हजार एकरमध्ये पसरली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान बिघडल्यामुळे आघ अधिक पसरू शकते. सँटा एनाच्या पर्वतरागांवरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग लॉस एँजिल्स आणि वेचुरा काऊंटीमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. आणि वाऱ्याची गती १२० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोमवार आणि मंगळवारपर्यंत अशी परिस्थिती उद्भवू शकते. अशाच आग केवळ पसरणार नाही तर अधिक भयावह रूप धारण करेल.