अमेरिकेच्या लॉस अँजलिसमधील काऊंटीच्या सहा जंगलांमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग रहिवासी भागातही पोहोचली आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि 1100 हून जास्त इमारती जळून खाक झाली आहेत. एक लाखांहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या भागात सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आग विझविण्याचं काम अधिक अवघड झालं आहे. त्यामुळे जंगलांना आग लागताच ती पसरत गेली. ही आग राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं संकट असल्याचं सांगितलं जात आहे.
हजारो इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी...
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या भीषण आगीत कमीत कमी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील दुसरं सर्वात मोठं शहर कॅलिफोर्नियाच्या जवळ लागलेल्या या आगीत हजारो इमारती आगीच्या विळख्यात आल्या. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, यामध्ये एक लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, सोसाट्याचा वारा वाहत असल्याने आग विझविण्यास अडचणी येत आहेत.
सहा जंगलांना लागली आग...
लॉस अँजलिसच्या हॉलिवूड थंड हवेच्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी एक पत्रकार परिषदेत सांगितलं की, लॉस अँजलिस काऊंटीमध्ये आतापर्यंत सहा जंगलांना आग लागली आहे. या आगीमुळे पन्नास बिलियन डॉलरहून अधिक नुकसान झालं आहे.