Strait Of Hormuz Latest Update : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात येऊन सर्वत्र शांतता पसरेल,अशी अपेक्षा भारत सरकारने व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायस्वाल यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. होर्मुजमध्ये भारताच्या जहाजाचे स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची मागणी भारत सरकारकडून करण्यात आली आहे. कारण समुद्री मार्गावरील आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
होर्मुजच्या टोलबाबत मोठं वक्तव्य
इराणने होर्मुजमध्ये जहाजांवर लावलेल्या टोलबाबत जायस्वाल यांनी म्हटलंय की, याप्रकरणी इराणसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. परराष्ट्र मंत्री जयशंकर 11-12 एप्रिलला यूएईच्या दौऱ्यावर आहेत. तर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी 9-10 एप्रिलला कतारच्या दौऱ्यावर आहेत. भारत अन्य देशांच्याही (GCC) संपर्कात आहे.
नक्की वाचा >> चप्पलमध्ये लावला GPS ट्रॅकर, पतीनं मोबाईलवर पाहिले पत्नीचे कारनामे, स्वत:च्याच घरी बायकोला रंगेहाथ पकडलं अन्..
आणखी एक एलपीजी टँकर भारतात पोहोचला
शिपिंग मिनिस्ट्रीचे अधिकारी मुकेश मंगल यांनी दिलासादायक माहिती दिली की,एलपीजी टँकर ग्रीन आशा गुरुवारी सकाळी सुरक्षितपणे नवी मुंबईच्या जेनपीटी बंदरात पोहचला आहे.यामध्ये 15,400 टन एलपीजी आहे. यामुळे गॅस सप्लायमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. होर्मुजमध्ये भारतीय झेंडा असलेल्या कोणत्याही जहाजाचं नुकसान झालं नाहीय. सरकार समुद्री व्यापारी मार्गांवर सतत नजर ठेवून आहे,असंही त्यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> Miss India Sayli Surve Case : पुण्याची मॉडेल सायली सुर्वेनं घेतला यू-टर्न, लव्ह जिहाद प्रकरणाला नवं वळण
औषधांचे दर वाढले नाहीत, मिथेनॉलबाबत चिंता
'रसायने आणि खते मंत्रालय'चे वरिष्ठ अधिकारी सत्यप्रकाश टीएलने म्हटलं की,देशात औषधांच्या किंमतीत वाढवण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. पश्चिम आशियाई संकटामुळे मिथेनॉलचा तुटवडा चितेंची बाब बनली आहे. सरकार मिथेनॉलच्या पर्यायी उपलब्धतेबाबत सकारात्मक विचार करत आहे.