भयानक!!! शाळकरी मुलांचा शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार, गुलाम बनवत घर पेटवून दिले

पीडिता हा सगळा त्रास असह्य झाल्याने सप्टेंबर 2024मध्ये आजारी पडल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
व्हिएन्ना:

शाळेच्या शिक्षिकेला ब्लॅकमेल करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तिला गुलाम बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर या मुलांनी या शिक्षिकेचे घरही पेटवून दिले आहे. सदर प्रकरणात 14 ते 17 वयोगटातील 7 मुलांचा समावेश असून या सगळ्यांविरोधात ऑस्ट्रियामध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने म्हटलंय की तिच्यावरील अत्याचारांना एप्रिल 2024 पासून सुरूवात झाली. पीडित महिला ही 28 वर्षांची असून याच शाळेत पूर्वी शिकणाऱ्या एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत सूत जुळले होते.  या विद्यार्थ्याच्या मित्रांना ही बाब कळाली आणि त्यानंतर या शिक्षिकेच्या घरी हे सात जण सतत जाऊ लागले होते. 

नक्की वाचा: AI मुळे 44 क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात; तुमचं प्रोफेशन आहे का यादीत? OpenAI कडून धोक्याचे संकेत!

सगळे विद्यार्थी परदेशी असल्याचे उघड

आरोपी विद्यार्थ्यांपैकी काही जण इराक (Iraq), रोमानिया (Romania) आणि अफगाणिस्तानचे (Afghanistan) मूळचे रहिवासी आहेत. हे विद्यार्थी स्थानिक गुंडांच्या टोळीशी (Local Gang) संलग्न होते. ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून घरात प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी शिक्षिकेच्या घराचा वापर अंमली पदार्थ (Drugs) साठवण्यासाठी करण्यास सुरुवात केली. शिक्षिकेला मारहाण करणे, तसेच सिगारेट, टॅक्सी आणि खाण्या-पिण्याच्या खर्चासाठी वारंवार पैसे उकळणे असे प्रकार या मुलांनी केले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, प्रत्येकवेळी होणाऱ्या अत्याचारांचे त्यांनी चित्रीकरणही केले. नोकरी गमावण्याच्या भीतीने (Fear of losing job) या शिक्षिकेने याबाबत सुरुवातीला कोणाकडेही वाच्यता केली नाही.

नक्की वाचा: विमानात मासांहारी जेवण दिल्याने प्रवाशाचा गुदमरून मृत्यू; कुटुंबीयांकडून खटला दाखल

त्रासामुळे शिक्षिका आजारी पडली

पीडितेने आरोप केला आहे की 14 आणि 15 वर्षांच्या मुलांनी तिच्या घरात अनेकदा चोरी केली आणि तिचे घरही पेटवून दिले. या मुलांच्या वकिलांनी ड्रग तस्करी, चोरीचे आरोप मान्य केले असले तरी लैंगिक अत्याचाराचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.  पीडिता हा सगळा त्रास असह्य झाल्याने सप्टेंबर 2024मध्ये आजारी पडल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पीडीतेच्या घराच्या गच्चीवर तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्याचेही चित्रीकरण करण्यात आल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले आहे.   व्हिएन्ना कोर्ट या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे. द सन या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
 

Topics mentioned in this article