
- 85 साल के पैसेंजर ने कतर एयरवेज की फ्लाइट में वेज खाने का प्री-ऑर्डर दिया था लेकिन उन्हें नॉन वेज खाना मिला
- फ्लाइट के दौरान नॉन वेज खाना खाते समय डॉ. जयवीरा का दम घुटने लगा और वह बेहोश हो गए, बाद में उनकी मौत हुई
- मृतक के बेटे सूर्या जयवीरा ने कतर एयरवेज के खिलाफ लापरवाही और गलत मौत का मुकदमा दायर किया है
कतार एअरवेजच्या एका विमानामध्ये निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात निवृत्त हृदयरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. जयवीरा यांना जीव गमवावा लागला आहे. लॉस एंजिल्स येथून कोलम्बोला जाणाऱ्या विमानातून जयवीरा प्रवास करत होते. शाकाहारी असलेले 85 वर्षीय प्रवासी डॉ. जयवीरा यांना शाकाहारी जेवणाची आधीच ऑर्डर देऊनही नॉन-व्हेज जेवण देण्यात आले.
इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार, 30 जून 2023 रोजी कतार एअरवेजच्या 15.5 तासांच्या या लांब पल्ल्याच्या विमानामध्ये ही घटना घडली. डॉ. जयवीरा यांनी विशेषतः शाकाहारी जेवणाची मागणी केली होती, परंतु एका फ्लाइट अटेंडेंटने त्यांना सांगितले की, वेज जेवण उपलब्ध नाही. त्याऐवजी, त्यांना नॉन-व्हेज जेवण देण्यात आले आणि चिकन बाजूला ठेवून उर्वरित जेवण खाण्यास सांगितले.
(नक्की वाचा : Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step )
दुर्दैवाने, अटेंडेंटने सांगितल्याप्रमाणे मांसाहार वगळून खाण्याचा प्रयत्न करत असताना डॉ. जयवीरा यांचा दम गुदमरण्यास सुरुवात झाली आणि ते बेशुद्ध झाले. विमानातील कर्मचाऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु जयवीरा यांची तब्येत बिघडत गेली. अखेरीस, स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे विमान उतरवण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू एस्पिरेशन न्यूमोनियामुळे झाला, जो अन्न किंवा द्रव चुकून फुफ्फुसांमध्ये गेल्याने होणारा एक संसर्ग आहे.
कतार एअरवेजवर 1.1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा
या गंभीर घटनेनंतर, मृत डॉ. जयवीरा यांचे चिरंजीव सूर्या जयवीरा यांनी आता कतार एअरवेज विरुद्ध खटला दाखल केला आहे. सूर्या जयवीरा यांनी एअरलाइनच्या फूड सर्व्हिस आणि मेडिकल सर्व्हिसवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.
(नक्की वाचा- Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्ता कट! नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत कोण पुढे? वाचा सविस्तर)
या खटल्यात दावा करण्यात आला आहे की, एअरलाइन पूर्व-ऑर्डर केलेले शाकाहारी जेवण पुरवले नाही. मेडिकल इमर्जन्सीच्या काळातही वैद्यकीय मदत दिली नाही. जयवीरा कुटुंबाने निष्काळजीपणा आणि चुकीच्या मृत्यूसाठी एअरलाइनकडून जवळपास 1.1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे, जी कायद्यानुसार किमान रक्कम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world