बहुप्रतिक्षित मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा 21 नोव्हेंबर रोजी पार पडली. यंदाचा 74 वा किताब मेक्सिकोच्या Fatima Bosch हिने पटकावला. त्यांनी 100 हून अधिक स्पर्धकांना मागे टाकत हा मानाचा मुकुट आपल्या नावावर केला. मावळत्या 73 व्या मिस युनिव्हर्स डेन्मार्कच्या विक्टोरिया कजर थीलविग यांनी फातिमा बॉश यांना या सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपदाचा मुकुट परिधान केला. थायलंडच्या प्रवीणर सिंह ही उपविजेती (Runner-up) ठरली. तर व्हेनेझुएलाच्या स्टेफनी अबासेली आणि फिलिपिन्सच्या मा आहतिशा मनालो यांनी अनुक्रमे दुसरी आणि तिसरी रनर-अप म्हणून यश मिळवले.
फातिमा बॉश यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मेक्सिकोच्या तबास्को येथील विलाहर्मोसा येथील फातिमा बॉश ही रहिवासी आहे. तिच्या विजयानंतर मिस युनिव्हर्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओमध्ये फातिमा बॉश खूप भावूक झालेली दिसली. तसेच तिच्या डोक्यावर असलेला ताज तिच्या सौंदर्याला अधिक आकर्षक बनवत होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांकडून बॉश यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना या किताबसाठी योग्य मानले जात आहे.
भारताची स्पर्धक मानिका कितव्या क्रमांकावर
मिस युनिव्हर्स 2025 च्या शर्यतीत Manika Vishwakarma हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. तिला तर टॉप 12 तून बाहेर पडावे लागले. तिने टॉप 30 मध्ये आपले स्थान निश्चित केले होते. मात्र, त्या स्पर्धेतून बाहेर पडल्याने भारतीय चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिल्या. या स्पर्धेत आधी भारताचा दबदबा राहीला आहे. भारतीय स्पर्धकांनी बाजी मारली होती. यावेळी मात्र मानिकाला विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही.
विजयानंतर फातिमा भावूक
मेक्सिकोतील विलाहर्मोसा येथील रहिवासी असलेल्या फातिमा बॉशने हा किताब जिंकताच तिच्या भावना अनावर झाल्या. मिस युनिव्हर्सच्या इन्स्टाग्राम पेजवरील व्हिडिओमध्ये ती खूपच भावूक झालेली दिसत आहे. तिच्या डोक्यावरील तेजस्वी ताज तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहे. फातिमाच्या या विजयाने चाहते भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर 'तीच या किताबाची खरी हकदार' अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.