Expensive Toilet: शौचालय हा घराचा एक अत्यावश्यक भाग असतो. पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का, की एका शौचालयाची किंमत एखाद्या आलिशान हवेली किंवा खासगी जेटपेक्षा जास्त असू शकते? होय, हे खरं आहे! जगातील सर्वात महागडे शौचालय (World's Most Expensive Toilet) सध्या लिलावासाठी उपलब्ध आहे. हे टॉयलेट सामान्य नसून, 100 किलो वजनाचे शुद्ध सोन्यापासून बनवलेले एक अनोखे शौचालय आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ऐवढेच काय ही रक्कम ऐकली तर तुम्हाला गरगरायला ही लागेल.
'अमेरिका' नावाचे शौचालय
या अमूल्य शौचालयाचे नाव "अमेरिका" (America) असे आहे. हे प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन (Maurizio Cattelan) यांनी तयार केलेल्या एका खास कलाकृतीचे नाव आहे. हे शौचालय 18 कॅरेट सोन्यापासून बनवलेले असून, त्याचे अंदाजित वजन 101.02 किलोग्रॅम म्हणजेत 223 पौंड इतके आहे. या शौचालयाची सुरुवातीची बोली 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 88 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लिलावात जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ते विकत घेण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे.
पूर्णपणे कार्यरत सोन्याचे शौचालय
बहुतांश कलाकृती केवळ सजावटीसाठी असतात, पण 'अमेरिका'च्या बाबतीत तसे नाही. हे घन सोन्याचे शौचालय पूर्णपणे कार्यरत आहे. म्हणजेच ते सामान्य शौचालयाप्रमाणे वापरले जाऊ शकते. हे शौचालय केवळ ऐश आरामाचे (Luxury) प्रतीक नाही, तर समाजातील संपत्ती आणि संसाधनांच्या मूल्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते. कलाकाराने हे शौचालय, श्रीमंती आणि मूलभूत गरज यातील अंतर अधोरेखित करणारे व्यंग्य म्हणून सादर केले आहे.
चर्चेत असण्याचे आणखी एक कारण
हे शौचालय केवळ त्याच्या प्रचंड किंमतीमुळेच नाही, तर एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत आहे. हे शौचालय 2019 मध्ये इंग्लंडमधील ब्लेनहाइम पॅलेसमधून चोरीला गेलेल्या सोन्याच्या शौचालयासारखेच आहे. त्यावेळी, ऐतिहासिक राजवाड्यातून सोन्याचे शौचालय चोरीला गेल्यामुळे ही घटना जगभर गाजली होती. आता, न्यूयॉर्कमध्ये (New York) अशाच प्रकारचे शौचालय लिलावासाठी उपलब्ध असल्याने त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘America' golden toilet bowl sold for $12.1 million at Sotheby's
— RT (@RT_com) November 19, 2025
The fully functional 18-karat gold toilet by banana-strapper Mauizio Cattelan hammered after just one bid; the bidder's name is not disclosed
So… another one of Zelensky's buddies? pic.twitter.com/GbBJRcGU7R
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world