अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला (Astronaut Shubanshu Shukla) अंतराळात झेपावले आहेत. अनेकदा रद्द झाल्यानंतर अखेर मिशन Axiom-4 अंतराळात (Mission Axiom-4) झेपावलं आहे. हे मिशन अंतराळात झेपावत असताना अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत होते. त्यांची आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. अखेर यशस्वीपणे मिशन Axiom-4 अंतराळात झेपावलं आहे.
अंतराळात झेपावताच शुभांशू शुक्ला याने भारतीयांना संदेश दिला आहे. शुभांशू अंतराळात झेपावतान भारतीयांना आनंद व्यक्त करण्यात आला. भारताच्या भविष्यातील विकासासाठी ही मोहिम अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या मोहिमेच्या निमित्ताने भारताच्या ह्युमन स्पेस प्रोगामची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अंतराळात झेपावताच शुंभाशूने भारतीयांसाठी एक खास संदेश दिला आहे.
माझ्या प्रिय भारतीयांनो, नमस्कार... काय झेप होती!
41 वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहे. कमालीची राइड होती. सध्या आम्ही साडे सात किलोमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. जो मला सांगतोय की या प्रवासात मी एकटा नाहीये. तुम्ही माझ्यासोबत आहात. ही केवळ माझी एकट्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठीच्या प्रवासाची सुरुवात नाही तर भारताची ह्युम स्पेस प्रोग्रामची सुरुवात आहे. माझी इच्छा आहे, सर्व भारतीयांनी या मोहिमेचा भाग व्हावे, तुम्हालाही तितकाच अभिमान वाटायला हवा. तुम्हीली यात उत्सुकता दाखवा. आपण सर्वजण मिळून भारताच्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात करूया. धन्यवाद, जयहिंद जयभारत!