म्यानमार, थायलंड दोन शक्तीशाली भूकंपाने हादरले आहेत. भूकंपाची तीव्रता एवढी होती की अनेक इमारती, पूलांचा पडझड झाली आहे. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी दुपारी 12.50 वाजता 7.7 आणि 6.8 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले बसला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे धक्के खूप तीव्र होते. भूकंपाचे केंद्र सागाईंग शहराच्या वायव्येस 16 किमी अंतरावर आणि 10 किमी खोलीवर होते. भूकंपामुळे मोठी वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाने मदतकार्य सुरु केलं असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आहे.
भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घराबाहेब आणि कार्यालयांमधून बाहेर पळताना दिसले. भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की ते थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवले.
बँकॉकमधील भूकंपाचे इतके तीव्र होते उंच इमारतीच्या छतावर असलेल्या स्वीमिंग पूलमधील पाणी धबधब्याप्रमाणे खाली पडू लागले. भूकंपाच्या वेळी इमारतीमध्येही कंपणं जाणवत होती. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी बाहेर पळ काढला.
सागाईंग फॉल्ट हा जगातील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. याआधीही येथे अनेक शक्तिशाली भूकंप झाले आहेत. म्यानमारच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंप 23 मे 1912 रोजी तौंगगीजवळ झाला. त्याची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल होती. ज्यामुळे बरेच नुकसान आणि जीवितहानी झाली होती.