भारतीय वंशांची नासाची अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर मागील 9 महिन्यांपासून अंतराळात अडकली होती. मात्र आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज 18 मार्च रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) वरून निघतील. त्यांचे अंतराळयान 19 मार्च रोजी सकाळी पाण्यात उतरेल.
सुनीता विलियम्सच्या यांच्या परतीचे संपूर्ण वेळापत्रक
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांच्या परतीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार
- 18 मार्च सकाळी 8.15 – हॅच क्लोज
- 18 मार्च सकाळी 10.35 वाजता – अनडॉकिंग (आयएसएसपासून अंतराळयान वेगळे करणे)
- 19 मार्च पहाटे 2.41 वाजता – डी-ऑर्बिट बर्न (वाहनाचा वातावरणात पुन्हा प्रवेश)
- 19 मार्च पहाटे 3.27 वाजता – स्प्लॅश डाउन (अंतराळयानाचे समुद्रात उतरणे)
- 19 मार्च, सकाळी 5 वाजता – संपूर्ण घटनेची पत्रकार परिषद
नासाच्या मते, हवामानाच्या परिस्थितीनुसार स्प्लॅशडाउनचे स्थान बदलले जाऊ शकते.
पाहा LIVE
लँडिंगला किती वेळ लागेल?
नासाने स्पेसएक्स ड्रॅगन हॅच क्लोजरची तयारी सुरू केली आहे. ड्रॅगन अंतराळयानाच्या हॅच बंद करण्याची प्रक्रिया आज भारतीय वेळेनुसार सकाळी 8.15 वाजता सुरू झाली. हे अंतराळयान आज भारतीय वेळेनुसार सकाळी 10.35 वाजता आयएसएसवरून अनडॉक होईल. म्हणजेच ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनपासून (ISS) वेगळे होईल. त्यानंतर 19 मार्च रोजी पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरेल. या प्रवासाला अंदाजे 17 तास लागतील. हवामानामुळे परतीचे वेळापत्रक देखील बदलू शकते.
परतीचा प्रवास कसा असेल?
स्पेसएक्सचे क्रू मिशन 15 मार्च रोजी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना घेण्यासाठी अंतराळात गेले होते. हे अभियान 4 अंतराळवीरांसह सुरू करण्यात आले. 16 मार्च रोजी क्रू- 10 मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये पोहोचली. आता क्रू-9 चे चार अंतराळवीर त्यांच्या जबाबदाऱ्या क्रू-10 च्या अंतराळवीरांना सोपवतील आणि सप्टेंबर 2024 मध्ये पार्क केलेल्या त्यांच्या अंतराळयानात अंतराळ स्टेशनमध्ये परततील. क्रू-10 मोहिमेतील अंतराळवीर अॅन मॅकक्लेन आणि निकोल आयर्स, जपानचे ताकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह 16 मार्च रोजी अंतराळ स्थानकावर पोहोचले. सुनीता विल्यम्ससह इतर अंतराळवीरांनी त्यांचे स्वागतही केले.