Contraceptive coil failed : ब्राझीलमध्ये जन्मलेल्या एका बाळाने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर विषय असा की त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो हाताच्या मुठीत गर्भनिरोधक कॉइल किंवा कॉपर टी पकडलं आहे. गर्भधारणा रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कॉपर टीचा वापर केला जातो. मिररच्या एका वृत्तानुसार, मैथ्यूस गेब्रियल नाव असलेल्या बाळाचा जन्म नेरोपोलीस येथील साग्राडो कोराक्सो डी रुग्णालयात झाला.
गर्भधारणा रोखण्यासाठी 99 टक्क्यांहून अधिक प्रभावी
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसापर, या बाळाची आई क्वेडी अराऊजो डी ओलिवेराने साधारण दोन वर्षांपूर्वी कॉपर टी लावून घेतली होती. गर्भधारण रोखण्यासाठी ही कॉइल 99 टक्के प्रभावी मानली जाते. आययूडी हा एक लहान टी आकाराचं उपकरण असतं. ज्याचा उपयोग गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भाशयाच्या आत ठेवलं जातं. हे गर्भाशयात तांबं सोडतं, ज्यामुळे शुक्राणुंना प्रतिकूल वातावरण तयार होते. हे उपकरण 5 ते 10 वर्षे प्रभावी राहू शकतं.
गर्भवती असल्याचं चाचणीत उघड...
क्वेडीला नियमित चाचणीदरम्यान ती गर्भवती असल्याचं लक्षात आलं. कॉइल व्यवस्थित काम करीत होतं. त्यामुळे क्वेडी निश्चिंत होती. ती गर्भवती झाल्यानंतर पुढे काय करावं असा मोठा प्रश्न दाम्पत्यासमोर उभा राहिला. डॉक्टरांनी सांगितलं की, कॉइल हटवल्यास गर्भावस्थाला धोका होऊ शकतो. तिची गर्भावस्था आव्हानात्मक होती. तिला रक्तस्त्राव होत होता. तर अनेकदा गर्भपातासारखंही वाटत होतं. इतका त्रास सहन केल्यानंतर क्वेडीची डिलिव्हरी अत्यंत सुरक्षितपणे झाली.
आई आणि मुलं दोघंही सुरक्षित...
जन्मानंतर तेथील डॉक्टरांनी कॉपर टी जन्मजात बाळाच्या हातात ठेवली. प्रसुतीच्या खोलीत घेतलेल्या या फोटोत मैथियसच्या हातात त्यालाच रोखण्यासाठी लावलेली कॉइल दिसत आहे. डॉक्टरांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, ही कॉपर टी मला रोखू शकली नाही, जिंकल्याची ट्रॉफी हातात पकडली आहे.