Dogs Suicide Bridge: या रहस्यमयी पुलावरुन कुत्रेच करतात आत्महत्या; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल!

The Dog Suicide Bridge: या पुलावर पाऊल ठेवताच काहीतरी विचित्र घडायला सुरुवात होते. विशेषतः मुक्या प्राण्यांना, म्हणजेच कुत्र्यांना या पुलावर पोहोचल्यावर काय होतं, हे कोडे अजूनही सुटलेले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
The Dog Suicide Bridge: जगातील सर्वात भयानक जागांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश होतो.
मुंबई:


The Dog Suicide Bridge:  निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका सुंदर देशात एक असा पूल आहे, जो पर्यटकांना आपल्या सौंदर्याने आकर्षित करतो. पण याच सौंदर्याच्या मागे दडलंय एक भयानक वास्तव. या पुलावर पाऊल ठेवताच काहीतरी विचित्र घडायला सुरुवात होते. विशेषतः मुक्या प्राण्यांना, म्हणजेच कुत्र्यांना या पुलावर पोहोचल्यावर काय होतं, हे कोडे अजूनही सुटलेले नाही. इथे आल्यावर पाळीव कुत्रे अचानक बेभान होतात आणि कोणतीही भीती न बाळगता थेट मृत्यूच्या दिशेने झेप घेतात.

काय आहे या मृत्यूच्या पुलाचे रहस्य?

जगातील सर्वात भयानक जागांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश होतो. गेल्या 70 वर्षांपासून इथे अशा घटना घडत आहेत ज्यांचा उलगडा आजही झालेला नाही. जेव्हा एखादा मालक आपल्या कुत्र्याला घेऊन या पुलावरून फिरण्यासाठी निघतो, तेव्हा तो कुत्रा अगदी शांत असतो. पण पुलाच्या मध्यभागी पोहोचताच कुत्र्याच्या अंगात जणू काहीतरी संचारते. 

तो जोराने ओरडू लागतो आणि मालकाच्या हातातून सुटून सरळ पुलाच्या कड्यावरून खाली उडी मारतो. धक्कादायक बाब म्हणजे, जे कुत्रे पहिल्या उडीत वाचले, त्यांनी पुन्हा वर येऊन त्याच ठिकाणावरून दुसरी उडी मारली आहे.

( नक्की वाचा : Dog Attack :रस्त्यावर कुत्र्यांनी घेरले तर काय करावे? डॉग एक्सपर्टच्या या टिप्स तुमचा जीव वाचवू शकतात ! VIDEO )

कुठे आहे रहस्यमयी ठिकाण?

आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हे ठिकाण नेमके कुठे आहे. हे ठिकाण युरोपमधील स्कॉटलंड या देशात आहे. स्कॉटलंडच्या डंबार्टन या ऐतिहासिक भागातील एका जुन्या वाड्याच्या वाटेवर हा पूल लागतो. या पुलाचे नाव ओव्हरटौन ब्रिज असे आहे.

Advertisement

1950 च्या दशकापासून या 50 फूट उंचीच्या पुलावरून शेकडो कुत्र्यांनी उड्या मारल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या प्रसारमाध्यमांनी देखील या डॉग्स सुसाइड ब्रिजवर सविस्तर रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत. ही जागा इतकी धोकादायक झाली आहे की, आता तिथे पर्यटकांना सावध राहण्याचा इशारा देणारे बोर्ड लावावे लागले आहेत.

( नक्की वाचा : Dog Attack: मॉर्निंग वॉक बेतला जिवावर! पाळीव कुत्र्याचा महिलेच्या मानेवर थेट हल्ला; पाहा थरारक प्रकार, VIDEO )

स्थानिकांच्या समजुती आणि वैज्ञानिकांचे दावे

या पुलाला घेऊन स्थानिक लोकांमध्ये अनेक भीतीदायक कथा प्रचलित आहेत. काहींच्या मते, इथे एक व्हाईट लेडी नावाची आत्मा भटकते, जी कुत्र्यांना स्वतःकडे खेचते. अनेक कुत्र्यांच्या मालकांनी अनुभवले आहे की, पुलावर पोहोचल्यावर कुत्र्यांचे स्वभाव पूर्णपणे बदलतात.

Advertisement

दुसरीकडे, वैज्ञानिक याला एक वेगळे वळण देतात. वैज्ञानिकांच्या मते, पुलाच्या खाली काही विशिष्ट प्रकारचे प्राणी जसे की मिंक राहतात. त्यांच्या शरीराचा वास कुत्र्यांच्या नाकाला खूप लवकर जाणवतो. तो वास शोधण्याच्या नादात आणि उत्सुकतेपोटी कुत्रे पुलाच्या भिंतीवरून खाली उडी मारतात. वासाची ही थिअरी काही अंशी पटण्यासारखी असली, तरीही एकाच जागेवरून कुत्रे का उडी मारतात, याचे उत्तर विज्ञानाकडेही नाही.

( स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. NDTV नेटवर्क याची पृष्टी करत नाहीत. )
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement
Topics mentioned in this article