Oxford Word of the Year : 'Brain Rot' ठरला वर्ड ऑफ द इयर, पण याचा अर्थ काय? 

ऑक्सफोर्डने ब्रेन रॉट या शब्दाची वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषणा केली आहे. मात्र या शब्दाचा अर्थ काय आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ऑक्सफोर्डने वर्ल्ड ऑफ द इयर 2024 ची घोषणा केली आहे. ऑक्सफोर्डने ब्रेन रॉट या शब्दाची वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषणा केली आहे. मात्र या शब्दाचा अर्थ काय आहे? ब्रेन रॉट म्हणजे काहीही विचार न करता सोशल मीडियावर केवळ स्क्रोल करीत जाणं... सतत आणि काहीही कारणाशिवाय  सोशल मीडियावर स्क्रोल करणाऱ्यांसाठी ब्रेन रॉट या शब्दाचा वापर केला जातो. आता थेट ऑक्सफोर्डने ब्रेन रॉट या शब्दाची वर्ड ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. 

नक्की वाचा - Heart Health: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...

सकाळी उठताच मोबाइलवर स्क्रोल करणं किंवा ऑनलाइन कंटेन्ट पाहण्यात वेळ घालवणं हे सध्या नॉर्मल झालंय. हा प्रकार इतका नॉर्मल झाला आहे की, आपल्यासारखे लोक यालाही कंटाळलेत. तिच मुलाखत, त्याच मुलाखतीचा रील किंवा शॉट्स, त्यावरच टेक्स्ट स्टोरी.. त्याच्यासंबंधितच फोटो. सोशल मीडियादेखील आता जुनं वाटायला लागलंय. म्हणूनच स्वत:च्या अनुभवांमध्ये सतत बदल करीत राहणं आवश्यक आहे, अन्यथा आयुष्य कंटाळवाणं होऊ  शकतं. दररोज तोच तोच ऑनलाइन कंटेन्ट पाहताना तुमच्या मानसिक आणि बौद्धिक समतोलासह जो खेळ खेळला जातो, त्यालाच ब्रेन रॉट म्हटलं जातं. जो कंटेन्ट पाहून तुम्हाला मानसिक थकवा जाणवतो त्यालाच ब्रेन रॉट म्हटलं जातं. 

हा कंटेन्ट तुमच्या काहीही कामाचा नसतो. यातून तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही. तो फक्त आपण पाहतो किंवा कन्ज्युम करीत असतो. याचं उदाहरणं द्यायचं झालं तर आपण एखादा फिटनेससंदर्भातील विषय सर्च केला किंवा एखाद्या मित्राने पाठवलेला रिल पाहिला. यानंतर AI खेळ खेळायला लागतो. तुम्हाला धडाधड 100 रील्स येतात. तुम्ही तो कंटेन्ट पाहाल पण फिट होऊ शकणार नाही. कारण यासाठी रीलच्या जगातून बाहेर पडावं लागेल. 

Advertisement

ऑक्सफोर्डच्या संकेतस्थळानुसार, 2023 ते 2024 दरम्यान या शब्दाचा वापर 230 टक्क्यांनी वाढला आहे. ब्रेन रॉटचा सर्वात आधी 1854 मध्ये वापर करण्यात आला होता. हेनरी डेविड थोरोच्या वाल्डेन पुस्तकात याचा उल्लेख आहे.  

37 हजारांहून जास्त लोकांनी केलं मतदान..
जनतेच्या मतांच्या आधारावर ब्रेन रॉटला वर्ड ऑफ द इयर घोषित करण्यात आलं आहे. ऑक्सफोर्डच्या संकेतस्थळानुसार, 37 हजारांहून अधिक लोक मतदानात सहभागी झाले होते. मतदारांसाठी सहा शब्दांची एक यादी तयार करण्यात आली होती. त्यातून ब्रेन रॉट या शब्दाची निवड करण्यात आली. 

Advertisement