भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, 2 महिन्यांचे रेशन गोळा करण्यासाठी पळापळ

Pakistan latest situation: हलगाममधील घटनेनंतर भारत कधीही लष्करी कारवाई करु शकतो, ही भीती पाकिस्तानला सतावतीय. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pakistan latest situation: पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे.याबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. भारताच्या कारवाईला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी वल्गना पाकिस्तानकडून केली जात आहे. पण, त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या (LOC) नागरिकांना खाण्या-पिण्याचे साहित्य जमा करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. पहलगाममधील घटनेनंतर भारत कधीही लष्करी कारवाई करु शकतो, ही भीती पाकिस्तानला सतावतीय. त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहेत आदेश?

पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वर उल हक यांनी स्थानिक विधानसभेला सांगितले की नियंत्रण रेषेजवळ असलेल्या 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्न पुरवठा साठवून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हक म्हणाले की, प्रादेशिक सरकारने 13 मतदारसंघांमध्ये 'अन्न, औषधे आणि इतर सर्व मूलभूत गरजा' पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी देखील तयार केला आहे.

( नक्की वाचा : India - Pakistan : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )
 

पंतप्रधान चौधरी अन्वर म्हणाले की, नियंत्रण रेषेजवळील भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणाही तैनात करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमधील एक हजारपेक्षा जास्त मदरसे किमान 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं हे मदरसे बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी आयएनएसला दिली आहे. 

( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे? )
 

पंतप्रधान मोदींनी दिलीय सैन्याला सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पहलगाम हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर  गोळीबार केला होता. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 'टीआरएफ' या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचं या हल्ल्यामागील कनेक्शन उघड झालं आहे. 

Advertisement