Pakistan Army Chief General Asim Munir. जागतिक दहशतवादाचं केंद्र अशी आता पाकिस्तानची ओळख आहे. भारताच्या शेजाऱ्याला त्यानं स्वत: लावलेल्या आगीचे चटके बसतायत. पण, त्यानंतरही त्यांच्या राज्यकर्त्यांना कोणतंही भान आलेलं नाही. लोकनियुक्त सरकार किंवा ज्यांच्या हातामध्ये या सरकारचा रिमोट आहे ते सैन्य प्रत्येकाच्या मनात भारत विरोध आणि धार्मिक कट्टरता ठासून भरली आहे. हे बीज आगामी पिढीमध्येही रोवण्याचं काम ते करत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आता विष ओकलंय. खरंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाकडून अन्य कोणती अपेक्षा नाही. पण, त्यांनी यंदा हा द्वेषाचा धडा पाकिस्तानच्या आगमी पिढीला देखील शिकवला. त्याचा परिणाम पाकिस्तानच्या आगमी पिढीवर होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुमच्या मुलांना शिकवा
विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या एका सभेत बोलताना जनरल मुनीर म्हणाले, 'पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट तुमच्या मुलांना नक्की सांगा. आपल्या पूर्वजांनी विचार केला की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हिंदूंपेक्षा वेगळी आहे. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या पद्धती वेगळ्या आहे. आपली परंपरा वेगळी आहे. विचार वेगळे आहेत. महत्त्वकांक्षा वेगळी आहे. हाच द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा आधार होता.'
मुनीर पुढं म्हणाले, 'आपण एक नाही दोन देश आहोत. त्यामुळेच आमच्या पूर्वजांनी हा देश बनवण्यासाठी संघर्ष केला. आमच्या पूर्वजांनी या देशाची निर्मिती करण्यासाठी खूप त्याग केला. त्यांनी या देशाचं संरक्षण कसं केलं हे आम्हाला माहिती आहे.
( नक्की वाचा : Pakistan PM 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव बदला', पाकिस्तानच्या पंतप्रधानांची दर्पोक्ती, Video )
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मुलींनी आणि मुलांनो पाकिस्तानची ही गोष्ट कधीही विसरु नका. आगामी पिढीला ही गोष्ट सांगायला विसरु नका. त्यांचं पाकिस्तानसोबततं नातं कधीही कमकुवत होता कामा नये.'
मानवजातीच्या इतिहासात आजपर्यंत कलमाच्या पायावर दोनच संस्थानं निर्माण झाली आहेत. पहिली रियासत-ए-तैयबा होती आणि १३०० वर्षांनंतर दुसरी रियासत आमची (पाकिस्तान) होती. असंही मुनीर यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी यापू्र्वी 18 मार्च रोजी बोलताना पाकिस्तानला 'कणखर देश' (हार्ड स्टेट)मध्ये करण्याची गरज व्यक्त केली होती. दहशतवादविरोधाची लढाई ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, असं त्यांनी सांगितलं.