Asim Munir : 'इस्लामाबादचा कसाई कुठं आहे?' पाकिस्तानी नागरिकांनीच दाखवली असीम मुनीरची लायकी, Video

जाहिरात
Read Time: 2 mins
Asim Munir : असीम मुनीर सध्या 5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
मुंबई:

Asim Munir in America :  पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अमेरिकेत घोर अपमान झाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी नागरिकांनीच त्यांना विरोध केला आहे. 'पाकिस्तानींचे मारेकरी', 'इस्लामाबादचा कसाई', 'सामूहिक मारेकरी' अशा घोषणा देत वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे व्हिडिओ ?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही पाकिस्तानी नागरिक मुनीर थांबलेल्या हॉटेलसमोर निदर्शनांसाठी जमले होते. वाहनांवर प्रोजेक्टर लावून मुनीर यांना 'सामूहिक मारेकरी' असं नाव त्यांनी दिलं होतं.  

Advertisement

मुनीर यांच्या विरोधातील निदर्शने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांनी आयोजित केली होती असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मुनीर यांच्यासमोर निदर्शक 'असीम मुनीर, तुम्ही भित्रे आहात', 'तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, सामूहिक मारेकरी', 'तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, हुकूमशहा' आणि 'पाकिस्तानींचे मारेकरी; अशा घोषणा देताना दिसत आहेत.

असीम मुनीर एका इमारतीतून बाहेर पडत होते, त्याचवेळी यांच्यासमोर संतप्त पाकिस्तानी निदर्शकांनी  ही घोषणाबाजी केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, निदर्शक अधिकाऱ्यांशी वाद घालतानाही दिसत आहेत.

PTI समर्थकांकडून असीम मुनीर यांचा विरोध

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या समर्थकांनी हा विरोध  आयोजित केला होता असा दावा केला जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा हा पक्ष आहे. PTI सध्याच्या पाकिस्तानी सत्तेचा दीर्घकाळापासून विरोध करत आहे. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिका भेटीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच, PTI ने वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शनांचे आवाहन केले होते.

5 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असीम मुनीर

पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मुनीर हे रविवारी 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. या दौऱ्याचा उद्देश अमेरिकेसोबतचे लष्करी आणि सामरिक संबंध मजबूत करणे हा आहे. अलीकडेच भारतासोबतच्या संघर्षामुळे असीम मुनीर चर्चेत आले होते. या संघर्षानंतर त्यांना पाकिस्तानात बढती मिळाली आहे.

( नक्की वाचा :  इराणमध्ये Live प्रसारणच्या दरम्यान इस्रायलचा बॉम्बवर्षाव, बातम्या सांगताना अँकर पळाली, पाहा Video

Topics mentioned in this article