पाकिस्तानच्या इतिहासातील लाजीरवाणी घटना, माजी ISI प्रमुखांचं होणार कोर्ट मार्शल

Pakistan's former ISI chief Lt Gen (retd.) Faiz Hameed :  पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
F
मुंबई:


 Pakistan's former ISI chief Lt Gen (retd.) Faiz Hameed :  पाकिस्तानच्या इतिहासातील आणखी एक लाजीरवाणी घटना उघड झाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना अटक करण्यात आली आहे. हमीद यांच्यावर कोर्ट मार्शल होणार असून त्यासाठी लष्कारानं त्यांना अटक केली आहे. हमीद 2019 ते 2021 या कालावधीमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुख होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाकिस्तानमधील इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशननं (ISPR) दिलेल्या माहितीनुसार फैज हमीद यांना सैन्यानं अटक केलीय. त्यानंतर टॉप सिटी हौसिंग घोटाळ्यात त्यांच्यावरील कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार फैज अहमद यांच्या विरोधात टॉप सिटी केस प्रकरणातील अनेक तक्रारींचा तपास करण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानं एक चौकशी समिती स्थापन केली होती. त्या चौकशीमध्ये फैज अहमद यांच्या विरोधात अनेक प्रकरणं समोर आले आहेत. फैज अहमद यांनी निवृत्तीनंतरही सैन्यातील अनेक नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. 

( नक्की वाचा : सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची! )
 

पाकिस्तान आर्मीकडून एप्रिल महिन्यात ही समिती स्थापन केली होती. पाकिस्तानच्या इतिहासात गुप्तचर संघटनेच्या माजी प्रमुखांना अटक करुन त्यांच्यावर कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरु होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article