जाहिरात

सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची!

सेंट मार्टिन बेट (Saint Martin Island) हे जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापारी मार्गावर आहे. बंगालच्या उपसागरावर दबदबा निर्माण करण्यासाठीही ते महत्त्वाचं आहे.

सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची!
Sheikh Hasina : शेख हसीना यांचं एक कथित भाषण व्हायरल झालंय. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेवर मोठा आरोप केला आहे.
मुंबई:

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशातून  भारतात दाखल झालेल्या शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी सत्ताबदलाचं कारण सांगितलं आहे. हसीना यांनी या सत्ताबदलासाठी थेट अमेरिकेवर ठपका ठेवलाय. देश सोडण्यापूर्वी हसीना यांना एक भाषण द्यायचं होतं. त्याचा मजकूर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये सेंट मार्टिन बेट (Saint Martin Island) अमेरिकेला दिलं असतं तर हे झालं नसतं, असं लिहिलं आहे. त्यामुळे हे सेंट मार्टिन बेट नेमकं कुठं आहे? अमेरिकेला ते बांगलादेशकडून का हवंय? हा प्रश्न अनेकांना पडलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुठे आहे सेंट मार्टिन?

सेंट मार्टिन हे बांगलादेशमधलं एकमेव कोरल रीफ बेट आहे. बांगलाच्या खाडीतील उत्तर पूर्व भागात हे बेट आहे. या बेटाचा आकार फक्त 3 चौरस किलोमीटर आहे. या बेटाला नारिकेल जिन्जीरा  (Narikel Zinzira) म्हणजेच नाराळाचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. 

सेंट मार्टिन बेट कॉक्स बाजार-टेकनाफ बेटापासून जळपास 9 किलोमीटर दक्षिणेला आहे. म्यानमारच्या वायव्य किनाऱ्यापासून हे फक्त 8 किलोमीटर पश्चिमेला आहे. 

(नक्की वाचा : बांगलादेशमधील शेख हसीना सरकार अमेरिकेमुळे पडलं? ऑफर धुडकावण्याची मोजली किंमत! )
 

सेंट मार्टिन बेटाचा इतिहास

हे बेट 1900 साली ब्रिटीश इंडियाचा भाग होतं. 1937 साली म्यानमार भारतापासून वेगळं झालं. त्यावेळी हे भारताचा भाग बनलं. 1947 साली भारताची फाळणी झाली. त्यावेळी हे बेट पाकिस्तानात गेलं. त्यावेळी बांगलादेश देखील पाकिस्तानचा भाग होता. 1971 साली पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळं झालं. त्यावेळी हे बेट बांगलादेशला मिळालं. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये 1974 साली या बेटाबाबत एक करार झाला. त्यामध्ये हे बेट बांगलादेशचा भाग असल्याचं निश्चित झालं. 

Latest and Breaking News on NDTV

सेंट मार्टिन बेटाबाबत 1974 साली झालेल्या करारानंतरही म्यानमारचा या बेटावर दावा आहे. हे प्रकरण समुद्री कायद्यांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणकडं (आईटीएलओएस) पोहोचले होते.  आईटीएलओएसनं 2012 साली हे बेट बांगलादेशचा भाग असल्याचा निर्णय दिला. त्यानंतरही हे आपलं बेट असल्याचा म्यानमारचा दावा कायम आहे. 

सेंट मार्टिन बेटावर 3 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. यामधील बहुतेक जण मासेमार आहेत. त्याचबरोबर पर्यटकांचंही हे आवडतं बेट आहे. हे बेट अतिशय सुंदर इथं अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. 

( नक्की वाचा : पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका, मालदीव आणि आता बांगलादेश... धूर्त चीन कसं रचतोय चक्रव्यूह? )
 

अमेरिकेची नजर

सेंट मार्टिन बेट जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापार मार्गापैकी एक असलेल्या मल्लाका मार्गावर आहे. या बेटावर सैन्याचा तळ असलेल्या कोणत्याही देशाची शक्ती बंगालच्या उपसागरामध्ये वाढणार आहे. या भागात दबदबा वाढवण्यासाठीच अमेरिकेला हे बेट हवं असल्याचं मानलं जात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

शेख हसीना यांनी हे बेट अमेरिकेला हवं असल्याचा दावा यापूर्वी देखील केला होता. हे बेट आपल्याला दिलं तर अमेरिकेनं निवडणूक जिंकण्यात मदत करण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा हसीना यांनी केला होता. आपण अमेरिकेचा तो प्रस्ताव फेटाळल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. अमेरिकेनं मात्र हा दाव फेटाळून लावला होता. हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दिलं होतं.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'मी पुन्हा येईन' शेख हसीना यांचे शेवटचे भाषण का झालं नाही सार्वजनिक?
सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची!
gujarati-and-chinese-duo-dupe-american-couple-of-1-4-million-dollar-worth-of-gold-complete-story
Next Article
तो गुजराती, ती चीनी दोघांनी मिळून केलं मोठं कांड, संपूर्ण अमेरिकेत खळबळ!