पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला, आंदोलकांकडून जाळपोळ

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Sindh Home Minister Attack : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, प्रदर्शनकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या घरावर फक्त हल्लाच नाही, तर त्यांच्या घराची जाळपोळही केली आहे. सोशल मीडियावर प्रदर्शनकर्त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात आंदोलक उघडपणे गोळीबार करताना दिसत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हे आंदोलक कालवा तयार करण्यास विरोध करत होते. या प्रदर्शनादरम्यान काही प्रदर्शनकर्त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले आंदोलक संतप्त झाले. त्यांनी गृहमंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार गोळीबार केला आणि नंतर घर पेटवून दिले.

( नक्की वाचा :  PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )

कालवा बांधण्यावरुन सुरू झालेला वाद

चोलिस्तान कालव्याचा मुद्दा सिंध प्रांत आणि पाकिस्तान सरकार यांच्यातील वादाचे मुख्य कारण बनला आहे. पाकिस्तानमधील शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकार चोलिस्तान वाळवंटाच्या सिंचनासाठी सिंधू नदीवर अनेक कालवा बांधण्याची तयारी करत आहे. मात्र, या योजनेला पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि सिंध प्रांतातील इतर राजकीय पक्ष विरोध करत आहेत

Advertisement
Topics mentioned in this article