Pakistan News : तुकडे-तुकडे पाकिस्तान! स्वतंत्र बलुचिस्ताननंतर आता सिंधुदेशाची मागणीही तीव्र, वाचा सविस्तर

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


Sindhudesh Freedom Movement : भारताविरोधात कायम दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचं अस्तित्वच आता धोक्यात आलंय. पाकिस्तानची शकलं होणार की काय अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये ओढवलीय. बलुचिसस्तान प्रांतानं स्वतंत्र देशाची घोषणा केल्यानंतर आता सिंध प्रांतातही स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत. पाकिस्तानपासून वेगळं होत नव्या स्वतंत्र देशाची मागणी सिंधवासीय करत आहेत. बलुचिस्तानंतर एकेक प्रांत आता वेगळ्या अस्तित्वाची मागणी करू लागले तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान उरेल की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सिंधूदेशाची मागणी

पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतामधील नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. हे नागरिक फक्त रोष्ट व्यक्त करुन थांबले नाहीत. त्यांनी थेट स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी केली आहे.  सिंधमधील राजकीय गट जय सिंध फ्रीडम मुव्हमेंट म्हणजेच जेएसएफएमनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनांना सुरुवात केलीय. स्वतंत्र सिंधु देशाचं राष्ट्रगीतही जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढलीय. 

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील बलुचिस्ताननं स्वतंत्र देशाची घोषणाच करून टाकली होती. त्यांनी संयुक्त राष्ट्रांपासून ते भारतापर्यंत आपल्या देशाला मान्यता देण्याची मागणीही केलीय. बलुच नेते मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची मागणी पुढे ठेवलीय.

( नक्की वाचा : पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला, आंदोलकांकडून जाळपोळ )

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी 

  • 1947 पासूनच पाकिस्तान बलुचिस्तानविरोधात शस्त्रबळाचा वापर करत आलाय.
  • आता संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेनं, भारतानं बलोचिस्तानला हवाई सुरक्षा पुरवावी
  • पाकिस्तानच्या लष्करी बळामुळे निरपराध बलोच नागरिक मारले जात आहेत
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर बलोच प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी

बलुचिस्ताननं मोठ्या प्रमाणात आपल्या मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय दरवाजे ठोठावल्यानंतर आता सिंध प्रांतातही स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत. सिंध प्रांतातील नागरिकांवरही पाकिस्तान सरकार अन्याय करत असल्याचा आरोप आहे. भाषा संस्कृती वेगळी असूनही सिंधी लोकांना सापत्न वागणूक दिली जाते, असा दावा सिंधवासिय करत आहेत. फाळणीपासूनच हा वाद धुमसत आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Operation Sindoor : चिनी यंत्रणा जाम करत भारतानं फक्त 23 मिनिटांमध्ये कापले पाकिस्तानचे नाक! वाचा Inside Story )

स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी 

  • सिंधी ओळख आणि स्वायत्ततेच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून संघर्ष
  • बलोचिस्तानच्या स्वांतत्र्याच्या मागणीनंतर आता सिंधुदेशाचीही मागणी
  • 1972 नंतर स्वतंत्र सिंधुची मागणी पुढे आली
  • जी एम सय्यद यांच्या संकल्पनेतून जय सिंध तहरीकची स्थापना
  • पंजाबी पाकिस्तान्यांच्या वर्चस्वाला आव्हान
  • बेनझीर भुट्टोंच्या हत्येनंतर पुन्हा चळवळीला वेग
  • पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू सिंध प्रांतात राहतात
  • हिंदू व्यापाऱ्यांचं इथं प्राबल्य आहे
  • गुजराती भाषिक पारसी समाजही इथंच राहायचा
  • फाळणीनंतर इस्लामिक कट्टरतावादामुळे हिंदूंनी पलायन केलं.

पंजाबी लॉबीचं वर्चस्व

पाकिस्तानातील पंजाब प्रांताचंच सर्व क्षेत्रांमध्ये वर्चस्व असल्याचा आरोप होत असतो. हा प्रांत इतर प्रांतांचं आर्थिक शोषण करत असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर 2022 च्या अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात सिंधमध्ये न्यायालयीन हत्या आणि विकृत मृतदेह सापडण्याच्या व्यापक घटना घडल्याचं नमूद करण्यात आलं होतं. सिंधवासियांचा पाकिस्तानी लष्करावरही मोठा रोष आहे. संरक्षण क्षेत्रातही पंजाबी पाकिस्तान्यांचंच वर्चस्व असून ते सिंध-बलुच लोकांवर अन्याय करतात असा आरोप नेहमी होतो. सिंध, बलुच सारख्या निसर्गसंपन्न प्रांताची सुबत्ताही पंजाबी
पाकिस्तानीच हिरावून नेतात असाही आक्षेप आहे.

Advertisement

जन्माला आल्यानंतर 25 वर्षांच्या आत म्हणजेच 1971 मध्येच पाकिस्तानची फाळणी झाली. पूर्व पाकिस्ताननं स्वतःला पाकिस्तानपासून वेगळं करण्यासाठी स्वातंत्र्य लढा दिला आणि बांगलादेशचा जन्म झाला. आता आणखी अंतर्गत कलहामुळे आता पाकिस्तानचा नाकाशाच बदलणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

9 मे रोजी बलुचिस्ताननं स्वातंत्र्याची घोषणा केली. सिंध प्रांतात अशांतता आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही पाकिस्तानी अत्याचारांनी त्रस्त आहे. खैबर पख्तुनख्वामध्येही आंदोलनं सुरुच असतात. त्यामुळे पंजाब, खैबर पख्तुनख्वा, बलोच, सिंध, पीओके अशा पाकिस्तानच्या सर्वच कोपऱ्यांमध्ये कुरबुरी सुरु आहेत. हिंसक आंदोलनंही होत आहेत. थोडक्यात भारतात कुरापती करून काश्मीरला भारतापासून तोडू पाहणाऱ्या पाकिस्तानाचेच अनेक तुकडे होण्याच्या मार्गावर आहेत. ही आंदोलनं शमवण्याच्या पाकिस्तानच्या क्षमतेवरही सध्या प्रश्नचिन्हच आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article