भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानसमोर अडचणी आणि आव्हानांचा कायम डोंगर असतो. पाकिस्तानी खासदार सध्या देशातील वाढती महागाई, तोळामासाची अर्थव्यवस्था किंवा राजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त नाहीत. तर उंदरांनी त्यांची झोप उडवली आहे. पाकिस्तानच्या संसदेत उंदरांची संख्या प्रचंड वाढली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या उदरांनी संसदेमधील अनेक महत्त्वाच्या फाईल्स कुरतडल्या आहेत. त्यामुळे या उंदरांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेनं 12 लाख पाकिस्तानी रुपयांचं बजेट मंजूर केलंय. त्याचबरोबर संसदेमधील उंदीर पकडण्याचं काम मांजरांना दिलं जाणार आहे.
पाकिस्तामच्या कॅपिटल डेव्लपमेंट अथॉरिटीनं मांजरांना सांभाळण्यासाठी 12 लाख पाकिस्तानी रुपयांचं बजेट सादर केलंय. इतकंच नाही तर खासगी तज्ज्ञांची देखील या कामामध्ये मदत घेतली जाणार आहे. उंदरं पकडण्यासाठी खास पिंजऱ्यांची सोय देखील केली जाईल.
( नक्की वाचा : सापामुळे अमेरिकेतील शहराची बत्ती गुल, हजारो घरांमध्ये पसरला अंधार! )
पाकिस्तानची सिनेट, नॅशनल अॅसेंब्ली, सचिवालय या परिसरात पेस्ट कंट्रोल केले जाणार आहे. खासगी संस्थांना हे काम सोपवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार संसदेच्या छताला किड लागल्यानं उंदरांची संख्या वाढली आहे. पाकिस्तानच्या संसदेमधील अस्वच्छता हा अनेक वर्षांपासूनचा एक मोठा मुद्दा आहे.