जाहिरात

सापामुळे अमेरिकेतील शहराची बत्ती गुल, हजारो घरांमध्ये पसरला अंधार!

Snake Sparks Massive Power Outage: एका सापामुळे हजारो घरांची बत्ती गुल झाल्याचं तुम्ही यापूर्वी कधी ऐकलंय का? तुम्हाला हे चमत्कारिक वाटेल पण, खंर आहे. अमेरिकेत हा प्रकार घडलाय.

सापामुळे अमेरिकेतील शहराची बत्ती गुल, हजारो घरांमध्ये पसरला अंधार!
एका सापामुळे 11 हजार पेक्षा जास्त घरांमधील बत्ती गुल झाली. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Snake Sparks Massive Power Outage:  सापाबद्दलच्या एका घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांना धक्का बसला आहे. ती घटना समजल्यावर कदाचित तुम्हाला देखील धक्का बसेल. एका सापामुळे हजारो घर अनेक तास अंधारात होती. एका सापामुळे हजारो घरांची बत्ती गुल झाल्याचं तुम्ही यापूर्वी कधी ऐकलंय का? तुम्हाला हे चमत्कारिक वाटेल पण, खंर आहे. अमेरिकेत हा प्रकार घडलाय. अमेरिकेतील एका शहरातील 11 हजारांपेक्षा जास्त घरांची वीज सापामुळे गेली होती. पाहूया काय आहे पूर्ण प्रकरण....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार साप एका हाय व्होल्टेज क्षेत्रात शिरला आणि तेथील ट्रान्सफॉर्मला धडकला. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. साप वीजेच्या तारेत अशा पद्धतीनं अडकला की त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि 11,700 पेक्षा जास्त घरांमधील वीज तब्बल दीड तास बंद होती. 

कोणत्या शहरात घडला प्रकार?

अमेरिकेतील व्हर्जिनीया शहरातल्या Kiln Cree, Central Newport News आणि Christopher Newport University सह अनेक भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण एक साप आहे, असं डोमिनियन एनर्जी (Dominion Energy) च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीनं काम सुरु केलं. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुमारे दीड तास लागले. या काळात जवळपास 11,700 ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.

ट्रेंडिंग बातमी - Only Fan Page मुळे चर्चा, मेडल जिंकताच Video व्हायरल! कोण आहे ती खेळाडू?
 

शहरात अंधार पसरवणारा साप कोणत्या प्रजातीचा होता हे अद्याप समजलेलं नाही. व्हर्जिया शहरात साधारणपणे इस्टर्न गार्टर स्नेक आणि  इस्टर्न रॅट स्नेक या सापांच्या प्रजाती आढळतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Video: लाच घेतलेल्या पैशाचं वाटप करताना CCTV मध्ये सापडले पोलीस, पुढं काय घडलं?
सापामुळे अमेरिकेतील शहराची बत्ती गुल, हजारो घरांमध्ये पसरला अंधार!
Manu Bhakar mother spoke for the first time about Neeraj and Manu Bhakar relationship
Next Article
नीरजकडून कसलं वचन घेतलं? अखेर मनू भाकरच्या आईने स्पष्टच सांगितलं..