Pakistan Train Hijack : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानातील बलोच लिबरेशन आर्मीनं एक संपूर्ण रेल्वेच हायजॅक केली आहे. या रेल्वेत 100 पेक्षा जास्त प्रवासी होते. त्या सर्वांना ओलीस ठेवण्यात आले आहे. हल्लेखोरांनी ड्रायव्हरला गोळी मारली. त्यामध्ये तो जखमी झाली. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनल्सनी दिलेल्या वृत्तानुसार काही हल्लेखोरांनी दक्षिण-पाकिस्तानमधील रेल्वेवर गोळीबार केला. यामध्ये अनेक जण जखमी झाली. पाकिस्तानच्या लष्करातील 6 जणांना हल्लेखोरांनी ठार मारले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हल्लेखोरांनी जफर एक्स्प्रेस ही रेल्वे हायजॅक केली आहे. ही रेल्वे क्वेटाहून पेशावरला जात होती. तेथील राज्य सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कुनरी आणि गदलारच्या दरम्यान रेल्वेवर भीषण गोळीबार झाला अशी माहिती बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ता शाहिद रिंद यांनी दिली आहे.
हल्लेखोरांनी रेल्वे ट्रॅक देखील उडवून लावला आहे. सैन्याकडून काही कारवाई झाली तर ओलीस ठेवलेल्या नागरिकांना ठार मारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या प्रवाशांमध्ये सैन्य, पोलीस आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या काही जणांचाही समावेश आहे. आम्ही महिला आणि मुलांना सोडून दिलं आहे, अशी माहिती बलोच लिबरेशन आर्मीनं (बीएएलए) दिलीय.
( नक्की वाचा : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय? )
एका सुरुंगाच्या स्फोटानं ही रेल्वे थांबवण्यात आली. यावेळी सुरुवातीला करण्यात आलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान सरकार येथील साधनसंपत्तीचा वापर करते पण, या भागाचा कोणताही विकास करत नाही, असा दावा बीएलएनं केलाय.
रेल्वे विभागानं घटनास्थळावर एक रेल्वे पाठवली आहे. क्वेटामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. सर्व संस्थांनी सतर्क राहावं अशी सूचना बलुचिस्तान सरकारनं दिले आहेत.