पाकिस्तानमधील रावळपिंडीमधील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयानं मोठी कबुली दिली आहे. पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) जनरल सय्यद असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याचा सहभाग मान्य केलाय. मुनीर यांनी संरक्षण दिवसानिमित्त केलेल्या भाषणात भारताविरुद्ध झालेल्या तीन युद्धासह कारगिलचाही उल्लेख केला. त्यांनी पाकिस्तानी सशस्त्र बलांच्या 'शहीद' सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयात उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी सांगितलं,' पाकिस्तान निश्चितच एक शक्तीशाली आणि शूर देश आहे. त्याला स्वातंत्र्याच्या मुल्याची जाणीव आहे. हे स्वातंत्र्य कसं राखायचं याची माहिती आहे. 1948, 1965, 1971 मधील पाकिस्तान आणि भारतामधील कारगिल युद्ध किंवा सियाचिन युद्ध आपल्या हजारो लोकांनी देशासाठी बलिदान दिलं. ते देशाच्या सुरक्षेसाठी शहीद झाले.'
मूनीर यांचं वक्तव्य कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याच्या प्रत्यक्ष भूमिकीची कबुली मानली जात आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखानं सार्वजनिकरित्या कारगिल युद्धातील सैन्याच्या सहभागाची कबुली दिली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पाकिस्ताननं या युद्धात त्यांचं सैन्य सहभाग असल्याचं कधीही मान्य केला नव्हता.
( नक्की वाचा : Kandahar Hijacking : 'इस्लाम कबूल करा', कंदहार अपहरणातील पीडित महिलेनं उघड केली अनेक रहस्यं )
काश्मीरमधील 'स्वातंत्र्य सैनिकांनी' 1999 साली कारवाई केली होती, असा पाकिस्तानचा आजवरचा दावा आहे. माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनीही कारगील युद्ध हे स्थानिकांनी केलेली यशस्वी कारवाई होती असा नेहमी दावा केला होता.
कारगिल युद्धात मारले गेलेल्या सैनिकांचे मृतदेह पाकिस्ताननं ताब्यात घेतले नाहीत. त्यामुळे त्या सैनिकांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तान सरकार आणि सैन्यावर नाराजी देखील व्यक्त केली होती.