माळीणपेक्षा भयंकर दुर्घटना; पापुआ न्यू गिनिआत दरड कोसळल्याने 670 जणांच्या मृत्यूची भीती

इंडोनेशियातील पापुआ न्यू गिनिया प्रांतात मोठी दुर्घटना घडली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

इंडोनेशियातील पापुआ न्यू गिनिया प्रांतात मोठी दुर्घटना घडली आहे. या भागात रविवारी पहाटे तीन वाजता दरड कोसळल्यामुळे तब्बल 670 जणांना मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  

पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बीपासून साधारण 600 किलोमीटर उत्तर-पश्चिमकडील एंगा प्रांताच्या काओकलाम गावात पहाटे तीन वाजता दरड कोसळल्याची घटना घडली. इंटरनॅशनल ऑर्गनायझशन फॉर मायग्रेशनने पापुआ न्यू गिनीमध्ये दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या 670 पर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी दरड कोसळल्यानंतर 150 हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली सापडले होते. 

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठीही बचाव कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्यांनी रविवारी तपास एजन्सी एएफपीला याबाबत माहिती दिली आहे. एंगा प्राविन्समध्ये बऱ्याच काळापासून पर्वताजवळील भागांमध्ये दरड कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र आता घडलेल्या या दुर्घटनेत गाव पूर्णत: उद्ध्वस्त झालं आहे. या दुर्घटनेमुळे 1000 हून गावकरी विस्थापित झाले आहेत. खाद्य पदार्थ, पाणी यांचा पुरवठाही पूर्णपणे थांबला आहे. परिसरात दरड कोसळत असून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 6 ते 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'रेमल' चक्रीवादळाचा कहर, पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ही राज्यं अलर्टवर

अद्यापही दरड कोसळत असल्याने बचावकार्य धीम्या गतीने...
पोर्ट मोरेस्बीच्या बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येथील परिस्थिती भयंकर आहे. या परिसरात अद्यापही दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. पाणीही कोसळत आहे. त्यामुळे बचाव कार्य करणाऱ्या लोकांना धोका पोहोचला आहे.