US Iran War मुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामी होणार? भारतासमोरील सर्वात मोठं आव्हान कोणतं?

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Petrol Diesel Price Hike News:
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ईरान पर अमेरिका और इजरायल के हमले में सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई की मौत हो गई और तनाव बढ़ गया है
  • होर्मुज जलडमरूमध्य बंद होने की घोषणा से वैश्विक तेल सप्लाई का करीब 30 प्रतिशत हिस्सा प्रभावित हो सकता है
  • ईरान के पास वैश्विक तेल भंडार का करीब 12% हिस्सा है और वो हर दिन 1.3 से 1.5 मिलियन बैरल तेल निर्यात करता है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

US Iran War : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील सोनं-चांदीवर होत असून कच्चा तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या  पुरवठ्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


इराणकडून सागरी मार्ग बंद करण्याची धमकी...

इराणने 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० ते ३० टक्के तेल याच मार्गातून वाहून नेले जाते. सौदी अरेबिया, इराक आणि यूएई सारख्या देशांतून भारतात येणारे तेल याच मार्गाने येते. जर हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला, तर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


भारतावर काय परिणाम होणार?

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला तातडीने कोणताही मोठा धोका नाही. भारताकडे सध्या १० दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आणि ५ ते ७ दिवसांचा अतिरिक्त इंधन साठा सुरक्षित आहे. भारत आपली ८८% कच्च्या तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्यातील ५०% तेल हॉर्मुजच्या मार्गाने येते. जर हा तणाव निवळला नाही, तर भारत रशियासारख्या इतर देशांकडून तेल खरेदी वाढवून पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असली तरी, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय सरकारी धोरण आणि कर रचनेवर अवलंबून असतो. सध्या तरी किमती स्थिर आहेत, मात्र जागतिक स्तरावर कच्च्या तेलाने ८० ते ९० डॉलरचा टप्पा ओलांडल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement